डोडा (जम्मू-काश्मीर) – येथील भदरवाह भागात बांधण्यात आलेल्या प्राचीन वासुकी नाग मंदिराची अज्ञातांकडून ५ जूनच्या रात्री तोडफोड करण्यात आली. सकाळी पुजारी मंदिरात आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पुजारी मंदिरात पोचले तेव्हा दरवाजे आणि खिडक्या तोडल्याचे, तसेच मूर्तीची मोडतोड झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने हिंदू येथे गोळा झाले आणि त्यांनी निदर्शने चालू केली. पोलीस या घटनेचे अन्वेषण करत आहेत. वासुकी नाग मंदिर ‘भदरवाहला भद्रकाशी’ या नावानेही ओळखले जाते. वासुकी नाग महाराज मंदिर कैलाश कुंड (कबला) समुद्रसपाटीपासून १४ सहस्र ७०० फूट उंचीवर आहे. ऑगस्ट-सप्टेंबर २०२१ मध्ये वार्षिक छडी यात्रेनंतर मंदिर बंद करण्यात आले होते.
Massive protest in Jammu after vandalism at Vasuki Nag Temple in Bhaderwah townhttps://t.co/7IElsq3IAe
— India TV (@indiatvnews) June 6, 2022
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक दैनिक सनातन प्रभात |