वाराणसी (उत्तरप्रदेश) – मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील इदगाह मशिदीच्या प्रकरणी हिंदु पक्षाकडून याचिका करणारे अधिवक्ता महेंद्र प्रताप सिंह यांना ठार मारण्याची धमकी एका व्हिडिओद्वारे दिल्याचे समोर आले आहे. यात ‘जामा मस्जिद इंतजामिया कमिटी आगरा’चे अध्यक्ष महंमद जाहिद कुरैशी हेच धमकी देत असल्याचे दिसून येत आहे. आगर्यातील जामा मशिदीमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर ते भाषण करत असतांना त्यांनी ही धमकी दिल्याचे समोर आले आहे. यानंतर पोलिसांनी कुरैशी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. दुसरीकडे अधिवक्ता महेंद्र प्रताप सिंह यांनी पोलिसांकडे संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
Mathura Krishna Janmabhoomi petitioner receives death threats from Agra Jama Masjid Committee President Jahid Qureshi, FIR lodged https://t.co/nUttCBF54g
— OpIndia.com (@OpIndia_com) June 5, 2022
१. महेंद्र प्रताप सिंह यांनी याविषयी सांगितले की, मी पुरातत्व विभागाला कायदेशीर नोटीस पाठवून आगर्याच्या शाही जामा मशिदीच्या परिसरातील बेगम साहिबा मशिदीच्या पायर्यांच्या खाली पुरण्यात आलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या मूर्ती परत देण्याची मागणी केली आहे. यामुळेच जाहिद कुरैशी याने मला ठार मारण्याची धमकी दिली आहे. या धमकीमुळे मला पोलीस संरक्षणाची आवश्यकता आहे.
२. पोलिसांनी गुन्हा नोंदवल्यावर जाहिद कुरैशी यांनी स्वतःचा बचाव करतांना म्हटले की, मंदिर अथवा मशीद या प्रकरणांमध्ये भाजप प्रत्यक्ष सहभागी होत नाही, तर महेंद्र प्रताप सिंह यांच्यासारख्या लोकांना, जे मशीद खोदण्याची मागणी करत आहेत, त्यांना पुढे करत आहे. आम्ही राष्ट्राच्या किंवा कोणत्याही सरकाराच्या विरोधात नाही, तर महेंद्र प्रताप सिंह यांच्यासारख्या लोकांच्या विरोधात आहोत.