Menu Close

कर्नाटकमधील सत्ताधार्‍यांनी भटकळमधील दंगलीचा अहवाल धुडकावल्यानेच देशातील आतंकवाद वाढला ! – श्री. प्रमोद मुतालिक

  • वेळेत योग्य ती उपाययोजना न केल्यानेच यासिन भटकळसारखे जिहादी निपजले !
  • वर्ष १९९३ मध्ये भटकळ येथे झालेल्या दंग्यासंदर्भातील अहवालाच्या चकतीचे (सीडीचे) लोकार्पण !
pramod_mutalik
श्री. प्रमोद मुतालिक

बेंगळुरू : कर्नाटकमध्ये सत्तेवर आलेल्या विविध शासनांनी मतपेटीचे राजकारण करत भटकळ दंग्याच्या संदर्भातील कै. मा. न्या. जगन्नाथ शेट्टी यांच्या अहवालाकडे दुर्लक्ष केल्यानेच आज देशभरात आतंकवाद वाढला आहे, असा आरोप श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी केला आहे. वर्ष १९९३ मध्ये भटकळमध्ये झालेल्या दंगलीच्या संदर्भात कै. मा. न्या. जगन्नाथ शेट्टी यांच्या आयोगाने सिद्ध केलेल्या अहवालाच्या चकतीचे (सीडीचे) लोकार्पण करतांना ते बोलत होते.

या वेळी कर्नाटक उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता अमृतेश एन्. पी., पनून कश्मीरचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अग्निशेखर, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

श्री. मुतालिक पुढे म्हणाले की,

१. १९९३ मध्ये तब्बल ९ मास चाललेल्या दंगलीत १७ लोक मत्यूमुखी पडले होते. १ वर्षाच्या चौकशीनंतर १९९४ मध्ये आयोगाने त्याचा अहवाल सादर केला.

२. भटकळ येथे आतंकवादी शिबिरे चालतात, असे नमूद करून अहवालात शासनाला सावधान करण्यात आले होते; मात्र सदर अहवाल सिद्ध करून २२ वर्षे उलटून गेली तरी मुसलमान मतपेढीला धक्का लागू नये, या दृष्टीने तो काँग्रेस, भाजप तसेच जनता दल (संयुक्त) यांपैकी कोणत्याही शासनाने स्वीकारलेला नाही. त्याचा परिणाम म्हणून भटकळमध्ये चालणार्‍या या आतंकवादी शिबिरातून इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा जन्म झाला.

३. एका न्यायमूर्तींनी अभ्यासांती बनवलेल्या अहवालावर अल्पशी चर्चाही न करता राजकारण्यांनी तो धुडकावून लावला.

४. हा अहवाल धुडकावण्याचा परिणाम म्हणजे, आता देशभरात कुठेही बॉम्बस्फोट, तसेच आतंकवादी कारवाया उघडकीस आल्यावर त्यांची तार भटकळपर्यंत जोडलेली आढळून येते. तसेच भटकळमधील अनेकांना आंतकवादी कारवायांतील सहभागाबद्दल अटकही करण्यात आलेली आहे. (अक्षम्य हलगर्जीपणा करत अहवाल न स्वीकारणार्‍या संबंधित मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी यांना फाशीची शिक्षा दिली, तरी ती अल्पच होईल ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

५. मा. न्या. जगन्नाथ शेट्टी आयोगाचा अहवाल स्वीकारून वेळीच कारवाई केली असती, तर अनेक आतंकवादी कारवाया नियंत्रित करून सर्वसामान्य नागरिकांचे शेकडो जीव वाचवता आले असते. तेव्हा आता तरी शासनाने जागृत व्हावे !

आतंकवाद्याला कडेकोट सुरक्षा पुरवणारे काँग्रेस शासन देशहिताचे कार्य करणार्‍यांच्या कुटुंबियांना सुरक्षा पुरवत नाही, हे दुर्दैव ! – श्री. प्रमोद मुतालिक

या वेळी महत्त्वाची माहिती देतांना श्री. मुतालिक म्हणाले, काँग्रेसच्या विद्यमान कर्नाटक शासनाने कै. मा. न्या. जगन्नाथ शेट्टी यांचा अहवाल स्वीकारला तर नाहीच; मात्र एवढा गौप्यस्फोट करणारा अहवाल बनवल्यामुळे आतंकवाद्यांकडून त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीविताला धोका निर्माण झाला. निधर्मी शासनाच्या निर्दयीपणाचा पुढचा टप्पा म्हणजे कै. मा. न्या. जगन्नाथ शेट्टी यांचा २ फेब्रुवारी २०१६ या दिवशी दीर्घ आजारपणामुळे मृत्यू झाल्यानंतर काँग्रेस शासनाने कोणतीही पूर्वकल्पना न देताच त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा काढून घेतली. त्यामुळे सध्या त्यांचे कुटुंब भयाच्या वातावरणात रहात आहे. कर्नाटक येथे अब्दुल नाझीर मदनीसारख्या आतंकवाद्याला कडेकोट सुरक्षा पुरवणारे काँग्रेस शासन जीव धोक्यात घालून देशहिताचे कार्य करणार्‍या शेट्टी यांच्या कुटुंबियांना सुरक्षा पुरवत नाही, यापेक्षा दुर्दैव काय असावे ? या वेळी श्री. मुतालिक यांनी शेट्टी यांच्या कुटुंबाला शीघ्रतेने सुरक्षा व्यवस्था पुरवावी, अशी शासनाकडे मागणी केली. (राष्ट्रभक्तांना सुरक्षा मिळण्यासाठी मागणी करावी लागते, हे देशासाठी लज्जास्पद नव्हे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *