|
नवी देहली – महंमद पैगंबर यांचा कथित अवमान करणारे विधान केल्यावरून भाजपने प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित केले आहे. तत्पूर्वी कतार, कुवैत, इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान, सौदी अरेबिया या देशांनी भारताच्या राजदूतांना बोलावून जाब विचारला. तसेच इस्लामी देशांची संघटना ‘ऑर्गेनायजेशन ऑफ इस्लामिक को-ओपरेशने’ही (ओआयसीने) या प्रकरणी भारतावर टीका केली. त्याला भारताने प्रत्युत्तर दिले आहे. दुसरीकडे सौदी अरेबियाने शर्मा यांचे निलंबन केल्याने समाधान व्यक्त केले आहे.
१. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले, ‘ओआयसी संघटनेने भारताच्या विरोधात केलेली विधाने चुकीची आणि संकुचित आहेत. भारत सरकार सर्व धर्माच्या लोकांचा सन्मान करते. काही लोकांनी आक्षेपार्ह विधाने आणि ट्वीट केली होती. ते भारत सरकारचे मत नाही. आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल.’
Our response to media queries regarding recent statement by General Secretariat of the OIC:https://t.co/961dqr76qf pic.twitter.com/qrbKgtoWnC
— Arindam Bagchi (@MEAIndia) June 6, 2022
२. पाकिस्तानच्या विधानावरही भारताने प्रत्युत्तर देतांना म्हटले, ‘अल्पसंख्यांकांच्या अधिकारांचे सातत्याने हनन करणार्यांची विधाने कुणावरही परिणाम करणारी ठरत नाहीत. अशा देशाला दुसर्या देशातील अल्पसंख्यांकांवर होणार्या अयोग्य गोष्टींविषयी बोलण्याचा मुळातच अधिकार नाही. पाकमध्ये हिंदु, शीख, ख्रिस्ती, अहमदी आदींवर अत्याचार होत आहेत, याचा जग साक्षीदार आहे. भारत सरकार सर्व धर्मांचा सन्मान करते. याउलट पाक कट्टरतावाद्यांचे कौतुक करते, स्मारक बनवते. पाकने भारतात द्वेष पसरवण्याऐवजी स्वतःच्या देशातील अल्पसंख्यांकांचे रक्षण करण्याकडे लक्ष द्यावे.’
Our response to media queries regarding recent statement by General Secretariat of the OIC:https://t.co/961dqr76qf pic.twitter.com/qrbKgtoWnC
— Arindam Bagchi (@MEAIndia) June 6, 2022