बेळगाव – १२ ते १८ जून या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ची माहिती देण्यासाठी बेळगाव येथील कन्नड साहित्य भवन येथे ८ जून या दिवशी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या पत्रकार परिषदेत हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये, हिंदु जनजागृती समितीचे श्री. हृषिकेश गुर्जर, हिंदुत्वनिष्ठ श्री. पंकज घाडी, ‘हमारा देश संघटने’चे श्री. व्यंकटेश शिंदे, तसेच सनातन संस्थेचे श्री. बापू सावंत यांनी पत्रकारांना संबोधित केले.
‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त सोलापूरच्या हिंदुत्वनिष्ठांचा सहभाग !
सोलापूर – ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला जाणाऱ्या हिंदुत्वनिष्ठांची ७ जून या दिवशी ‘ऑनलाईन’ बैठक घेण्यात आली. या वेळी पंढरपूर येथील ‘वारकरी संप्रदाय पाईक संघा’चे राष्ट्रीय प्रवक्ते ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, तुळजापूर येथील ‘जनहित संघटने’चे श्री. अजय साळुंके, प्रशांत सोंजी, अंबाजोगाई येथील ह.भ.प. डॉ. नाथराव गरजाळे, उद्योजक श्री. अभिजित महाजन, अधिवक्ता चंद्रकांत रणखांब, ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे, श्री. दत्तात्रय पिसे, सनातन संस्थेचे श्री. हिरालाल तिवारी उपस्थित होते. या वेळी श्री. राजन बुणगे यांनी अधिवेशनामध्ये होणारे विषय आणि अधिवेशनाचा उद्देश स्पष्ट केला.
या अधिवेशनासाठी पंढरपूर येथील हिंदु महासभेचे अध्यक्ष श्री. बाळकृष्ण डिंगरे, ‘श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समिती’चे अध्यक्ष श्री. गणेश लंके, सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. बापू ढगे, तसेच श्री. साई क्षीरसागर जाणार आहेत, अशी माहिती श्री. राजन बुणगे यांनी या वेळी दिली.