Menu Close

(म्हणे) ‘मुसलमानाने हिंदूंच्या देवतांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याची एकही घटना मला आठवत नाही !’

नुपूर शर्मा प्रकरणी अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा साळसूदपणा

नवी देहली – मुसलमान व्यक्तीने हिंदूंच्या देवतांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याची एकही घटना मला आठवत नाही, असे विधान अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले. नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्या कथित केलेल्या अवमानाविषयी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की,

१. या लोकांमध्ये (नूपुर शर्मा यांच्यासारख्या) चांगली भावना निर्माण होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या लोकांना ट्विटरवर ‘फॉलो’ करतात. त्यांनी काही तरी केले पाहिजे, त्यांनी हे विष अजून पसरण्यापासून रोखले पाहिजे.

२. नुपूर शर्मा यांना ठार मारण्याच्या धमक्या मिळत असतील, तर त्याचा निषेध केला पाहिजे. तशा पद्धतीने विचार करणेही चुकीचे आहे; म्हणूनच पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सध्या त्या स्थितीत आहेत. त्या देशांचे अनुकरण आपल्याला करायचे नाही; पण आपण ते थोड्याफार पद्धतीने करत आहोत. गायींची हत्या केल्याच्या संशयात लोकांना मारले जात आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *