Menu Close

दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाला उत्‍साही आणि भावपूर्ण वातावरणात प्रारंभ !

‘जयतु जयतु हिंदु राष्‍ट्रम्’, ‘हर हर महादेव’, अशा जयघोषात येथील श्री रामनाथ देवस्‍थान, फोंडा, गोवा येथे दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाला भावपूर्ण आणि उत्‍साही वातावरणात प्रारंभ झाला. हे अधिवेशन  १८ जून पर्यंत चालणार असून विविध राज्‍यांतील ४५० प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्‍थित आहेत.

अधिवेशनाचा प्रारंभ सनातन पुरोहित पाठशाळेतील श्री. अमर जोशी यांनी केलेल्‍या शंखनादाने झाला. यानंतर सनातन पुरोहित पाठशाळेचे सर्वश्री अमर जोशी आणि ईशान जोशी यांनी वेदमंत्रांचे पठण झाले. त्‍यानंतर हिंदु जनजागृती समितीचे मुंबईचे समन्‍वयक श्री. बळवंत पाठक यांनी श्री. अमर जोशी आणि श्री. ईशान जोशी यांचा सन्‍मान केला.

श्री. अमर जोशी आणि श्री. ईशान जोशी

हिंदूंनो, वर्ष 2025 मध्ये हिंदु राष्ट्र स्थापन होण्यासाठी आजपासून कृतीशील व्हा !- सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर देशभरात धर्मांधांनी चालू केलेला हिंसाचार पहाता, संपूर्ण शासन व्यवस्था हिंदु हिताची होत नाही, तोपर्यंत हिंदु राष्ट्रासाठी आपल्याला लढा द्यावाच लागेल. ‘वाराणसीतील नंदी आजही  ज्ञानव्यापी मशिदीकडे तोंड करून मूळ विध्वंसित मंदिराचे भग्नावशेष पहातो आहे ! कर्नाटकमध्ये  ‘पहले हिजाब, बाद मे किताब’ अशी मोहीमच विद्यार्थिनींच्या माध्यमातून कट्टरतावाद्यांनी चालू केली होती. उच्च न्यायालयाने त्या विरोधात निर्णय दिल्यानंतरही हिजाबची मागणी करणार्‍या मुसलमानांना ‘कुराण श्रेष्ठ कि देशाचे संविधान ?’, हा प्रश्न विचारण्याचे धाडस देशातील एकाही ‘सेक्युलर’वाद्याला झाले नाही ! हिंदूंनी ‘हिंदु राष्ट्रा’ची मागणी करणे अयोग्य कसे ? तो आमचा नैसर्गिक आणि घटनात्मक अधिकार आहे ! सध्या भारतात कार्यरत हिंदुविरोधी ‘अलायन्स’च्या मागे राजकीय स्वार्थ आहे. हा ‘अजेंडा’ हिंदु राष्ट्रासमोरील सर्वांत मोठे आव्हान आहे ! या हिंदुविरोधी ‘अलायन्स’ला पराभूत करण्यासाठी आपल्याला येणार्‍या काळात वैचारिक आणि बौद्धीक स्तरावर सातत्याने खंडण करावे लागेल. त्यादृष्टीने हे ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ महत्त्वपूर्ण आहे. कालमहिम्यानुसार वर्ष 2025 मध्ये हिंदु राष्ट्र येणारच आहे, त्यासाठी हिंदूंनो आतापासूनच कृतीशील व्हा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले. ते ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथील ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या अधिवेशनात देशविदेशातून, तसेच भारतातील विविध राज्यांतील 225 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित आहेत.

मराठी आणि हिंदी भाषेतील ‘हलाल जिहाद ?’ ग्रंथाचे प्रकाशन !

या वेळी हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत ‘भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण – ‘हलाल जिहाद ?’ या मराठी आणि हिंदी भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन व्यासपिठावर उपस्थित असणारे ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे संरक्षक तथा सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता पूज्य हरि शंकर जैन, ‘भारत सेवाश्रम संघा’चे स्वामी संयुक्तानंद महाराज, ‘इंटरनॅशनल वेदांत सोसायटी’चे स्वामी निर्गुणानंदगिरी महाराज आणि समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. अधिवेशनाचा प्रारंभ शंखनादाने करण्यात आला. यानंतर व्यासपिठावर उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. दीपप्रज्वलनानंतर वेदमंत्रांचे पठण झाले. या प्रसंगी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक संत सद्गुरु सत्यवान कदम यांनी केले. ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांनी ‘‘हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प काही वर्षांत पूर्ण होईल’, असे दिलेले आशीर्वचन चित्रफितीच्या माध्यमातून दाखवण्यात आले. अधिवेशनाच्या निमित्ताने ट्वीटरवर #10th_Hindu_Rashtra_Adhiveshan या हॅशटॅगद्वारे हिंदु राष्ट्राची चर्चा देशभर चालू असल्याचे दिसून आले. या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ HinduJagruti.org याद्वारे, तसेच ‘HinduJagruti’ या ‘यु-ट्यूब’ चॅनेल द्वारेही केले जात आहे.

सोहळ्‍यात सनातनचे संत पू. प्रदीप घेमका यांनी स्‍वामी संयुक्‍तानंद महाराज यांचा सन्‍मान केला, तर निर्गुणानंद महाराज आणि सद़्‍गुरु श्री. नवनीतानंद (गुरुवर्य श्री. मोडक) महाराज यांचा सन्‍मान हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक संत पू. नीलेश सिंगबाळ यांनी, तसेच पू. (अधिवक्‍ता) हरिशंकर जैन यांचा सन्‍मान सनातनचे धर्मप्रचारक सद़्‍गुरु नंदकुमार जाधव यांच्‍या शुभहस्‍ते करण्‍यात आला.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *