अधिवेशनाच्या उद़्घाटन सत्रात प.पू. स्वामी गोविंद देवगिरि महाराज यांनी दिलेल्या संदेशाचे चलचित्र दाखवण्यात आले. त्यांच्या संदेशाचे सार खालील प्रमाणे आहे.
भारतात अनादी काळापासून हिंदु संस्कृती आहे. ही संस्कृती प्रगल्भ विचारधारा घेऊन आली आहे. जगातील अन्य संस्कृतींचा लय झाला, तरी हिंदु संस्कृती आज टिकून आहे; कारण ही संस्कृती वैदिक विचारधारेवर आधारित आहे. या संस्कृतीला पुढे हिंदु संस्कृती या विचारधारेच्या रूपात मान्यता मिळाली. भारत हे हिंदु राष्ट्रच आहे. येथील भूमीत अनेक तीर्थाक्षेत्रे आहेत. हिंदु परंपरा ही आपली मूळ विचारधारा आहे. यामध्ये कोणाताही मतभेद असू शकत नाही. येथील भूमी आणि समाज हिंदु परंपरेने भारित आहेत; परंतु याविषयी जागृती होणे आवश्यक आहे. इतिहासामध्ये हिंदु संस्कृतीला नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. त्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेचे सर्वोत्तम प्रयत्न केले. हिंदु राष्ट्राला पुन्हा मान्यता मिळावी, यासाठी तरुणांमध्ये हिंदु संस्कृतीविषयी अभिमान निर्माण होणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्राच्या दृष्टीने भारत संपन्न होईल, तेव्हाच भारत विश्वाचे कल्याण करण्यासाठी सक्षम होईल.
हिंदु जनजागृती समितीचा हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प काही वर्षांत पूर्ण होईल !