उज्जैन : येथे ६ मे नंतर झालेल्या पावसानंतर ९ मेच्या दुपारी ३ च्या सुमारास सोसाट्याच्या वार्यासह पावसाला प्रारंभ झाला. यामुळे ठिकठिकाणी कक्षांच्या सीमा म्हणून लावण्यात आलेले पत्रे उडून गेले. एका संतांनी उभारलेली कमान या वार्यामुळे कोसळली. बर्याच ठिकाणच्या मांडवामध्ये पाणी शिरले तसेच काही ठिकाणी मांडव कोसळून त्यांची हानी झाली.
सनातनच्या साधकांनी केलेल्या नामजपानंतर काही वेळाने पाऊस थांबला !
या वेळी सनातनच्या साधकांनी महर्षींनी दिलेला जप केला. पाऊस थांबण्याची शक्यता नव्हती; मात्र साधकांनी जप चालू केल्यानंतर काही वेळाने पाऊस थांबला. महर्षींच्या कृपेने साधकांना कसलीच हानी न पोहोचता साधकांनी उत्साहात सेवा केली. साहित्याची किरकोळ हानी झाली.
प्रशासनाचे सिंहस्थ क्षेत्री अक्षम्य दुर्लक्ष !
प्रशासन आणि सरकार यांनी मागील आपत्कालीन परिस्थितीनंतर काहीच उपयायोजना न काढल्याने तसेच मागील अकाली पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काहीच न केल्याने संत आणि भाविक यांचे हाल होत आहेत (संतांची गैरसोय होऊ देणारे राज्यकर्ते आणि प्रशासन हे पाप कुठे फेडणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात