वाराणसीतील नंदी आजही भगवान काशी विश्वेश्वराकडे नाही, तर ज्ञानव्यापी मशिदीकडे तोंड करून मूळ मंदिराचे भग्नावशेष पहातो आहे ! सध्या काशी-मथुरा, कुतूबमिनार, अजमेर येथील ‘अढाई दिन का झोपडा’ अर्थात् ‘श्री सरस्वती मंदिर’ या मंदिरांविषयी आज चर्चा चालू झाली असली, तरी १ सहस्र ५६० प्राचीन हिंदु मंदिरांवर झालेले इस्लामी अतिक्रमण त्याच स्थितीत आहे. हिजाब प्रकरण असो किंवा नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांचा केलेला कथित अवमान असो, मुसलमानांनी घडवलेल्या दंगलींच्या विरोधात त्यांना ‘कुराण श्रेष्ठ कि देशाची घटना ?’, हा प्रश्न विचारण्याचे धाडस देशातील एकाही ‘सेक्युलर’वाद्याला झाले नाही. सध्या भारतात कार्यरत हिंदुविरोधी ‘अलायन्स’च्या मागे राजकीय स्वार्थ आहे. हा ‘अजेंडा’ हिंदु राष्ट्रासमोरील सर्वांत मोठे आव्हान आहे ! या हिंदुविरोधी ‘अलायन्स’ला पराभूत करण्यासाठी आपल्याला येणार्या काळात वैचारिक आणि बौद्धीक स्तरावर सातत्याने खंडण करावे लागेल. त्यादृष्टीने हे ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ महत्त्वपूर्ण आहे. कालमहिम्यानुसार वर्ष २०२५ मध्ये हिंदु राष्ट्र येणारच आहे, त्यासाठी हिंदूंनी आतपासूनच कृतीशील होणे आवश्यक आहे’, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद़्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले. ते १२ जून या दिवशी झालेल्या दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या उद़्घाटनप्रसंगी बोलत होते.
सद़्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे म्हणाले,
१. सध्या केंद्रामध्ये राजकीयदृष्ट्या साहसी निर्णय घेण्याची क्षमता असणारे शासन आहे. कलम ३७० हटवणे, श्रीराममंदिर उभारणे, नागरिकत्व सुधारणा कायदा करणे इत्यादी राजकीय निर्णय घेण्याचे धाडस केंद्रशासनाने दाखवले आहे.
२. केंद्रात स्थिर आणि राष्ट्रवादी शासन असले, तरी राज्यांमध्ये प्रांतीय आणि ‘सेक्युलर’ पक्षांची सरकारे आहेत. त्यामुळे देशात एकप्रकारचे राजकीय अराजक आहे. अशा परिस्थितीत आपण आताच ‘भारतीय राज्यघटनेद्वारे हिंदु राष्ट्र घोषित करा’, अशी मागणी केली पाहिजे. राज्यघटनेनुसार हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी करण्याची, हीच योग्य वेळ आहे.
३. मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात हिंदु विधीज्ञ परिषदेने वर्ष २०१३ मध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट केली होती. त्यानंतर सातत्याने भोंग्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले, तसेच अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनातही या प्रश्नी आवाज उठवण्यात आला. आता मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात हनुमान चालिसाचे पठण करून हिंदूंनी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. हे या अधिवेशनाचे फळ आहे. हिंदू वैध मार्गाने करत असलेल्या विरोधाला आपणही पाठिंबा दिला पाहिजे.
सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे म्हणाले, ‘‘कालमाहात्मनुसार वर्ष २०२५ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे. यासाठी महर्षी आणि संत यांचे आशीर्वाद आहेतच; मात्र हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात आपण शरीरासमवेत मनानेही सहभागी होऊन संघटित होणे आवश्यक आहे.’’