Menu Close

हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेचा उद़्‍घोष करणार्‍या सनातन संस्‍था आणि हिंदु जनजागृती समिती  एकमात्र ! – अधिवक्‍ता विष्‍णु शंकर जैन

उद़्‍बोधन सत्रातील भाषणातील अधिवक्‍ता विष्‍णु शंकर जैन यांनी परात्‍पर गुरु डॉ. आठवले, तसेच सनातन संस्‍था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्‍याविषयी काढलेले गौरवोद़्‍गार !

सनातन संस्‍थेशी जोडलो गेल्‍यावर ‘आम्‍ही आमच्‍या मातृसंस्‍थेत आलो आहोत’, असे वाटले. येथे आमच्‍या मनातील भावना व्‍यक्‍त करण्‍याची संधी देण्‍यात आली. हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेचा उद़्‍घोष करणार्‍या सनातन संस्‍था आणि हिंदु जनजागृती समिती या एकमात्र संघटना आहेत. हिंदु राष्‍ट्र स्‍थापन करण्‍याच्‍या त्‍यांच्‍या या ध्‍येयामुळे मी आणि माझे वडील या संघटनांकडे आकर्षित झालो.

आम्‍हाला मिळालेले यश, ही परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा ! – अधिवक्‍ता विष्‍णु शंकर जैन

आम्‍हाला जे यश आणि कीर्ती मिळाली, ती परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या आशीवार्दामुळे, असे मी आणि माझे वडील मानतो. गुरुदेवांची साधना आणि तप यांमुळेच आमचे कार्य निर्विघ्‍नपणे पार पडले. काशी विश्‍वनाथ मंदिराच्‍या खटल्‍यात आतापर्यंत आम्‍हाला मिळालेले यश हे सनातन संस्‍था, परात्‍पर गुरु डॉ. आठवले आणि सर्व हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना यांचे यश आहे.

प्राण गेला, तरी खटल्‍यातून मागे हटणार नाही ! – अधिवक्‍ता विष्‍णु शंकर जैन

काशी विश्‍वनाथ मंदिराच्‍या खटल्‍यातील ५ याचिकांपैकी मी माघार घेतली असल्‍याची अफवा परसवण्‍यात आली. खोट्या बातम्‍या देण्‍यात आल्‍या. प्राण गेला तरी या खटल्‍यातून मी मागे हटणार नाही.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *