Menu Close

धर्मांतर करतांना ख्रिस्‍ती हिंदूंमध्‍ये राष्‍ट्रविरोधी भावना निर्माण करतात ! – श्रीमती एस्‍थर धनराज

डावीकडून श्रीमती एस्‍थर धनराज, स्‍वामी निगुणानंद पुरी, एम्. नागेश्‍वर राव आणि नीरज अत्री

रामनाथी : जेव्‍हा ख्रिस्‍ती एखाद्या हिंदूंचे धर्मांतर करतात, तेव्‍हा त्‍यांच्‍यात राष्‍ट्रविरोधी भावना निर्माण करतात. हे धोरण केवळ भारतापुरते नाही, तर ख्रिस्‍ती ज्‍या देशात जातात तेथे हेच धोरण राबवतात. वर्ष १७०० पासून ख्रिस्‍ती अशा प्रकारची नीती वापरत आहेत, असे प्रतिपादन तेलंगाणा येथील भगवद़्‍गीता फाऊंडेशन फॉर वैदिक स्‍टडीजच्‍या सह संचालिका श्रीमती एस्‍थर धनराज यांनी केले. अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाच्‍या तिसर्‍या दिवशीच्‍या ‘धर्मांतर रोखणे आणि घरवापसीची योजना’ या पहिल्‍या सत्रात ‘पाश्‍चिमात्‍य राष्‍ट्रांत ख्रिस्‍त्‍यांची दुर्दशा आणि त्‍याचा भारतावरील प्रभाव’ या विषयावर त्‍या बोलत होत्‍या.

त्‍या पुढे म्‍हणाल्‍या …

श्रीमती एस्‍थर धनराज, सह संचालिका, भगवद़्‍गीता फाऊंडेशन फॉर वैदिक स्‍टडीज, भाग्‍यनगर, तेलंगाणा

१. अमेरिकेतील एका संस्‍थेने केलेल्‍या सर्वेक्षणानुसार तेथील ४७ टक्‍के ख्रिस्‍ती चर्चमध्‍ये जात नाहीत. त्‍यामुळे ख्रिस्‍त्‍यांनी अन्‍य धर्मियांवर लक्ष केंद्रित केेले असून ते त्‍यांचे धर्मांतर करण्‍याचे काम चालू केले आहे. यामध्‍ये हिंदूंचे ‘ब्रेन वॉशिंग’ केले जाते.

२. ख्रिस्‍ती त्‍यांच्‍या मुलांना बालपणापासून चर्चमध्‍ये नेत्‍यात. हिंदु पालकांनीही स्‍वत:च्‍या पाल्‍यांना हिंदु धर्माचे शिक्षण देणे आवश्‍यक आहे.

३. ख्रिस्‍ती तांदुळाच्‍या गोणीने धर्मांतर करत असतील, तर हिंदूंनी तांदुळाच्‍या गोणीने धर्मांतर रोखले पाहिजे. (‘तांदुळ किंवा अन्‍य साहित्‍य यांचे आमिष दाखवून ख्रिस्‍ती धर्मांतर करत असतील, तर हिंदूंनी गरीब हिंदूंच्‍या भरण-पोषणाचे दायित्‍व घेऊन धर्मांतर रोखले पाहिजे.)

४. गरजवंत हिंदूंना हिंदु संघटनांनी साहाय्‍य करायला हवे. आर्थिक साहाय्‍य करणे शक्‍य नसल्‍यास गरजवंत हिंदूंच्‍या पाठीशी ठामपणे उभे रहायला हवे.

५. धर्माच्‍या रक्षणासाठी वैयक्‍तिक, संघटित, घटनात्‍मक आणि आध्‍यात्मिक स्‍तरांवर लढा द्यायला हवा. संघटितरित्‍या प्रयत्न केल्‍यास भगवंताला आपणाला हिंदु राष्‍ट्र द्यावेच लागेल.

धर्माच्‍या आधारावर मुसलमान आणि ख्रिस्‍ती यांना निधीचे वाटप ही कोणती धर्मनिरपेक्षता ? – एम्. नागेश्‍वर राव, माजी प्रभारी महासंचालक, सीबीआय

एम्. नागेश्‍वर राव, माजी प्रभारी महासंचालक, सीबीआय

सरकारच्‍या तिजोरीत गोळा होणारा कर धर्मनिरपेक्ष आहे; परंतु त्‍याचा लाभ काही लोकांनाच दिला जातो. अल्‍पसंख्‍यांकांच्‍या कल्‍याणासाठी स्‍वतंत्र मंत्रालय आहे; परंतु बहुसंख्‍य हिंदूंचे हित पहाण्‍यासाठी मात्र कोणतीही व्‍यवस्‍था नाही. मागील ८ वर्षांत अल्‍पसंख्‍यांकांच्‍या विविध योजनांवर ३७ सहस्र ६६९ कोटी रुपये इतका निधी व्‍यय करण्‍यात आला आहे. तसेच राज्‍यांमध्‍ये अल्‍पसंख्‍यांकांवर व्‍यय करण्‍यात आलेला निधी त्‍यात मिळवल्‍यास हा निधी दुप्‍पट होईल. वर्ष २०११ च्‍या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्‍येच्‍या २० टक्‍के असलेले मुसलमान आणि ख्रिस्‍ती यांवर हा निधी व्‍यय केला जात आहे. ज्‍यांना निधीची आवश्‍यकता आहे, त्‍यांना निधी द्यायला हवा; मात्र विकास कामांमध्‍ये धर्म कुठून आला ? हा तुष्‍टीकरणाचा विषय आहे. अल्‍पसंख्‍यांकांमध्‍ये येणार्‍या पारशी पंथियांना काही प्रमाणातच निधी मिळतो. सामान्‍यतः जैन लोक सधन असतात, तर बौद्ध हिंदु धर्मासमवेतच असतात. त्‍यामुळे यांतील अधिकतम निधी मुसलमान आणि ख्रिस्‍ती यांच्‍यावरच व्‍यय केला जातो. धर्माच्‍या आधारे अल्‍पसंख्‍यांकांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी व्‍यय करणे, यांत कोणती धर्मनिरपेक्षता आहे ? राज्‍यघटना जर धर्मनिरपेक्ष आहे, तर सर्वांना समान वागणूक मिळायला हवी.

हिंदु धर्मानुसार साधना केल्‍यावर अन्‍य पंथियांमध्‍ये प्रेम आणि आपुलकी निर्माण झाली ! – स्‍वामी निर्गुणानंद पुरी, कोषाध्‍यक्ष आणि शाखा सचिव, इंटरनॅशनल, वेदांत सोसायटी, कोलकाता, बंगाल.

स्‍वामी निर्गुणानंद पुरी, कोषाध्‍यक्ष आणि शाखा सचिव, इंटरनॅशनल, वेदांत सोसायटी, कोलकाता, बंगाल.

स्‍वामी विवेकानंद यांनी हिंदूंच्‍याकडे आध्‍यत्मिक संपत्ती पुष्‍कळ असून ते हिंदूंना ठाऊक नाही, असे सांगितले होते. खरोखरच तशी हिंदूंची स्‍थिती आहे. जगात हिंदूंची संख्‍या पुष्‍कळ असली, तरी हिंदु धर्मानुसार कर्म करणारे हिंदू अल्‍प आहेत. इंडोनेशिया येथे मुसलमानांची संख्‍या अधिक आहे. त्‍यांनी मशिदीतील मौलवींकडून (इस्‍लामच्‍या धार्मिक नेत्‍यांकडून) दीक्षाही घेतली आहे. असे असतांनाही तेथील काही मुसलमानांना ‘ऑनलाईन’ अध्‍यात्‍म आणि वेद यांची माहिती दिल्‍यानंतर ते हिंदु धर्माकडे आकृष्‍ट होत आहेत. केवळ हिंदु धर्मानुसार साधना केल्‍यामुळे त्‍यांच्‍यात प्रेम आणि आपुलकी निर्माण होत आहे. ‘सनातन हिंदु धर्मात हिंसा शिकवण्‍यात येत नाही, तर तेथे प्रेम शिकवले जाते’, हे त्‍यांच्‍या लक्षात आले आहे. युरोपमधील ख्रिस्‍ती चर्चमध्‍ये जात नाहीत, ते केवळ नावालाच ख्रिस्‍ती आहेत. ‘ऑनलाईन’ संपर्काद्वारे आम्‍ही अशा लोकांना आमच्‍यासमवेत काही दिवस अध्‍यात्‍मिक सहवासात घालवण्‍यास सांगितलेे. तसे केल्‍यानंतर त्‍यांच्‍यात हळूहळू हिंदु धर्माविषयी आकर्षण आणि प्रेम निर्माण झाले. पुढे पुढे ते साधना करू लागल्‍यावर त्‍यांना आपल्‍या सुंदर अध्‍यात्‍मिक शक्‍तीचा अनुभव येईल. अशा तर्‍हेने आपण संपूर्ण विश्‍वाला हिंदु राष्‍ट्रात परिवर्तित करू शकतो. ‘सत्‍यमेव जयते’ असे आपण म्‍हणतो. सत्‍याविना विजय प्राप्‍त होऊ शकत नाही. हिंदु शास्‍त्रातील मोक्ष आणि मुक्‍ती मिळवण्‍याविषयी शिकवण दिली जाते, तशी शिकवण जगात इतर पंथांत दिली जात नाही.

सत्तेने साथ दिली नाही, तरी हिंदूंनी धर्माच्‍या आधारे मार्गक्रमण केल्‍यास त्‍यांना निश्‍चित शक्‍ती मिळेल ! – श्री. नीरज अत्री, अध्‍यक्ष, विवेकानंद कार्य समिती, पंचकुला, हरियाणा

श्री. नीरज अत्री, अध्‍यक्ष, विवेकानंद कार्य समिती, पंचकुला, हरियाणा

अनेक मुसलमान इस्‍लाम सोडण्‍याच्‍या मन:स्‍थितीत आहेत. त्‍यांना साहाय्‍य करायला हवे. पूर्वी घरवापसी (इस्‍लाम त्‍यागून हिंदु धर्मात प्रवेश केलेले) मुसलमान समाजासमोर येण्‍यास सिद्ध नसत; मात्र आता ‘घरवापसी’ केलेले अनेक मुसलमान समाजासमोर येत आहेत. मुसलमान समाजात इस्‍लामाच्‍या नावावर दुकानदारी चालवली जाते. १०० वर्षांचा इतिहास पाहिला असता मुसलमानांनी हिंदू आणि त्‍यांच्‍या महिला यांच्‍यावर अनन्‍वित अत्‍याचार केले आहेत. याचा अभ्‍यास करून स्‍वामी दयानंद सरस्‍वती यांनी प्रथम ‘घरवापसी’ चळवळ चालू केली; मात्र वर्ष १९१४ मध्‍ये मोहनदास गांधी यांनी जागे झालेल्‍या हिंदु समाजाला पुन्‍हा झोपवण्‍याचे काम चालू केले. गांधी यांनी ‘अहिंसा आणि  सर्वधर्मसमभाव’ यांच्‍या गोष्‍टी शिकवून हिंदूंना दुर्बल बनवले. अलीकडच्‍या काळात हिंदू आणि हिंदु धर्म यांवर झालेल्‍या आघातांना सामाजिक माध्‍यमांतून प्रत्‍युत्तर देणे चालू झाले.  यापूर्वी असे उत्तर दिले जात नव्‍हते. भाजपच्‍या माजी प्रवक्‍त्‍या नुपूर शर्मा यांना धर्मांध आणि गुंड यांच्‍याकडून दुर्भाग्‍यपूर्ण वागणूक मिळत आहे; मात्र शर्मा यांना हिंदूंनी पाठिंबा द्यायला हवा. ज्ञानव्‍यापीसारखे प्रश्‍न निरंतरपणे हाताळणे आवश्‍यक आहे. सत्तेने साथ दिली नाही, तरी हिंदूंनी धर्माच्‍या आधारे मार्गक्रमण केल्‍यास त्‍यांना निश्‍चित शक्‍ती मिळेल.

अधिवेशनाच्या या सत्राची झलक

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *