‘ऑल इंडिया लीगल एड फोरम’ तथा ‘अखिल भारतीय बार असोसिएशन’चे महासचिव अधिवक्ता जॉयदीप मुखर्जी यांच्या वतीने १४ जून या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ, पूर्वोत्तर भारत समन्वयक श्री. शंभू गवारे, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट, सनातन संस्थेच्या प्रवक्त्या कु. कृतिका खत्री आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर या सर्वांचा सत्कार करण्यात आला.
वैशिष्ट्यपूर्ण
पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांचा परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी भाव !
१४ जून या दिवशी सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांनी त्यांच्या भाषणाला प्रारंभ करण्यापूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना वंदन करून ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या प्रेरणेने आपण एकत्र आलो आहोत. जगाचा इतिहास आणि भूगोल पालटणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना प्रणाम’, असा भावपूर्ण प्रमाण केला.
२. मध्यप्रदेश येथील ‘अयोध्या फाऊंडेशन’च्या अध्यक्षा मीनाक्षी शरण यांनी श्री केदारनाथ आणि श्री बद्रीनाथ या देवतांच्या चरणांवर अर्पण केलेली चैतन्यमय पुष्पे प्रसादरूपाने अधिवेशनाच्या आयोजकांकडे सुपुर्द केली.
३. अमेरिकेतील कॅलिफोर्नियास्थित उद्योजक तथा ‘सेंटोलॉजी’ यू ट्यूब वाहिनीचे संपादक श्री. आदित्य सत्संगी हे ८ दिवसांसाठी भारतात आले आहेत. ते जिज्ञासेपोटी वेळात वेळ काढून अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उपस्थित राहिले.