‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’साठी प.पू. उल्हासगिरी महाराज यांचा संदेश !
हिंदु राष्ट्राची मागणी करणाऱ्या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे आम्ही समर्थन करतो. हिंदु धर्मापुढे आजच्या घडीला पुष्कळ आव्हाने आहेत. हिंदु बांधवांनी या आव्हानांना सामोरे गेले पाहिजे. धर्मांतर, लव्ह जिहाद, हिंदु देवतांचे विडंबन, देवतांच्या मूर्तींची तोडफोड, मंदिरांवरील आक्रमणे, हिंदूंच्या उत्सवांवर होणारी दगडफेक, दंगली, ग्रंथांची अवहेलना, पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण अशी असंख्य आव्हाने पहाता हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता लक्षात येते.
भारतामध्ये हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी जे जे कार्यरत आहेत, त्यांचे प्रत्येक हिंदूने समर्थन केले पाहिजे. गेली १० वर्षे हिंदु जनजागृती समिती देशभरातील हिंदूंच्या संस्था, संघटना, प्रखर हिंदुत्वनिष्ठ विचारवंत आदींचे अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचा माध्यमातून हिंदूसंघटन करण्याचा प्रभावी प्रयत्न करत आहे. तसेच सरकार दरबारी हिंदूंची भूमिका ठामपणे मांडत आहे. जात-पात, पक्ष, संस्था, संघटना संप्रदाय आदीमध्ये विभाजित झालेल्या हिंदूंना समिती एकत्र आणत आहे. हे हिंदु अधिवेशन म्हणजे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यातील महत्त्वपूर्ण पाया आहे. त्यामुळे आम्ही या अधिवेशनाला आमचे समर्थन देत आहोत, तसेच सर्व हिंदु बांधवांना आम्ही आवाहन करतो, ‘हिंदु राष्ट्राची एकमुखी मागणी करा आणि लवकरात लवकर भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी कृतीशील व्हा.’
हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ या वर्षी १२ ते १८ जून या कालावधीत रामनाथ देवस्थान, फोंडा या क्षेत्री आयोजित करण्यात आले आहे. आपण सर्वांनी HinduJagruti.org या संकेतस्थळाद्वारे हे अधिवेशन ‘ऑनलाईन’ अवश्य पहावे, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात आपण तन, मन आणि धन यांद्वारे यथाशक्ती सहभागी व्हावे !