Menu Close

अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी ‘विदेशातील हिंदूंचे रक्षण’ या विषयावर उद़्‍बोधन सत्र

डावीकडून प्रकाश दास, शंकर खरेल, पुरुषोत्तम सोमाणी आणि डॉ. भोलानाथ योगी

नेपाळला हिंदु राष्‍ट्र करण्‍यासाठी भारताच्‍या साहाय्‍याची आवश्‍यकता ! –  डॉ. भोलानाथ योगी, हिंदु विद्यापीठ, नेपाळ

डॉ. भोलानाथ योगी, हिंदु विद्यापीठ, नेपाळ

नेपाळमध्‍ये ९५ टक्‍के हिंदू आहेत; परंतु पाश्‍चात्त्यांच्‍या प्रभावामुळे आता तेथे टोपीच्‍या ऐवजी ‘टाय’ला प्राधान्‍य दिले जात आहे. नोकरीच्‍या निमित्ताने पाश्‍चात्त्य देशांत गेल्‍यामुळे नेपाळमध्‍ये पाश्‍चात्त्यांचा प्रभाव वाढत आहे. त्‍यामुळे हाताने भोजन करणार्‍यांना असभ्‍य समजले जाते. पाश्‍चात्त्यांचा प्रभाव वाढला असला, तरी नेपाळ अजूनही भारतीय संस्‍कृतीशी जोडला आहे. सद्य:स्‍थितीत नेपाळमधील १० सहस्र नागरिक भारतातील धार्मिक क्षेत्रांचे दर्शन घेण्‍यासाठी भारतात आले आहेत; परंतु हे सर्व हिंदू संघटित नाहीत. त्‍यामुळे नेपाळ साम्‍यवादी आणि नास्‍तिकतावादी यांचा अड्डा बनला आहे. नेपाळ सांस्‍कृतिकदृष्‍ट्या हिंदु राष्‍ट्रच आहे; परंतु राज्‍यघटने त्‍याला मान्‍यता देऊन ते हिंदु राष्‍ट्र होणे आवश्‍यक आहे. नेपाळी घालत असलेली टोपी, हे हिमालयाचे प्रतीक आहे. नेपाळमधील चलनी नोटांवर भगवान गोरखनाथ यांचे चित्र आहे. नेपाळमध्‍ये आजही ख्रिस्‍ती ‘कॅलेंडर’ चालत नाही, तर तेथे हिंदु पंचांगाचा उपयोग केला जातो. नेपाळ हे धार्मिकदृष्‍ट्या हिंदु राष्‍ट्रच आहे. राज्‍यघटनात्‍मक हिंदु राष्‍ट्र होण्‍यासाठी आम्‍हाला भारताकडून साहायाची आवश्‍यकता आहे, असे प्रतिपादन नेपाळ येथील हिंदु विद्यापिठाचे डॉ. भोलानाथ योगी यांनी केले. ते अधिवेशनाच्‍या सहाव्‍या दिवशीच्‍या ‘विदेशी हिंदूंचे रक्षण’ या सत्रातील ‘पाश्‍चात्त्यांच्‍या प्रभावामुळे नेपाळमधील हिंदु संस्‍कृतीची होत असलेली हानी’, याविषयावर बोलत होते.

भारतातील हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना आणि संप्रदाय यांच्‍या साहाय्‍याने नेपाळमध्‍ये १ मासात हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना शक्‍य ! – श्री. शंकर खराल, केंद्रीय वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष, विश्‍व हिंदु महासंघ, नेपाळ

श्री. शंकर खराल, केंद्रीय वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष, विश्‍व हिंदु महासंघ, नेपाळ

नेपाळमध्‍ये पराक्रमी लोक असून ते सनातन परंपरावादी आहेत; मात्र ते बलहीन असल्‍यामुळे, तसेच राजकीय कुरघोडीमुळे नेपाळ धर्मनिरपेक्ष राष्‍ट्र झाले. नेपाळ पुन्‍हा हिंदु राष्‍ट्र व्‍हावे, यासाठी ते प्रयत्न करत आहोत. तथापि नेपाळमध्‍ये हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना करण्‍यामध्‍ये ४ अडथळे आहेत. पहिला अडथळा अंतर्गत आहे. विविध हिंदु संप्रदाय संघटित नाहीत. त्‍यांना संघटित करणे आवश्‍यक आहे. दुसरा अडथळा बाह्य शक्‍तींचा आहे. चीन आणि अमेरिका नेपाळचा वापर करून स्‍वतःचा लाभ करून घेत आहेत. बाह्य आक्रमणापासून नेपाळला वाचवले पाहिजे. तिसरा अडथळा सैद्धांतिक आहे. यामध्‍ये साम्‍यवाद्यांनी नेपाळमधील हिंदु राष्‍ट्र नाहीसे करून नेपाळला धर्मनिरपेक्ष राष्‍ट्र केले आहे. त्‍यामुळे नेपाळ येथे भौतिकतावादी विचार आणि बेरोजगारीचे प्रमाणही वाढले आहे. चौथा अडथळा व्‍यवहारिक आणि अस्‍पृश्‍यता हा आहे. नेपाळमधील अस्‍पृश्‍यता नष्‍ट केली पाहिजे. नेपाळ येथे हिंदुत्‍वनिष्‍ठ खासदारांची संख्‍या वाढवून हिंदु राष्‍ट्र आणायला हवे. यासाठी दोन तृतीयांश इतक्‍या खासदारांची आवश्‍यकता आहे. वरील ४ अडथळे दूर करायचे असतील, तर भारतातील संतांनी नेपाळला साहाय्‍य केले पाहिजे. भारतातील संत, संप्रदाय, हिंदुत्‍वनिष्‍ठ आणि समविचारी लोक यांना संघटित करून त्‍यांच्‍या साहाय्‍याने नेपाळ येथे हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना केली पाहिजे. नेपाळमध्‍ये हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना करण्‍यासाठी भारताने साथ द्यावी. यासाठी प्रत्‍येक जिल्‍ह्यात सनातन संपर्क अभियान चालू केले आहे. गुरुकुल अभियान सर्वांत अधिक चालू  आहेत. भारतातील हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना, संप्रदाय यांनी संघटितपणे साहाय्‍य केल्‍यास आम्‍ही १ मासात नेपाळ येथे हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना करू शकतो, असे प्रतिपादन नेपाळ येथील विश्‍व हिंदु महासंघाचे केंद्रीय वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष श्री. शंकर खराल यांनी ‘नेपाळ येथे हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना करण्‍यात येणारे अडथळे’ या विषयावर बोलतांना केले.

अधिवेशनाच्या या सत्राची झलक

Related News

0 Comments

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *