Menu Close

भारताला अखंड हिंदु राष्‍ट्र बनवण्‍यापासून आम्‍हाला कुणीही रोखू शकत नाही ! – टी. राजासिंह

टी. राजासिंह, आमदार, भाजप, तेलंगाणा

रामनाथी : सनातन संस्‍थेचे संस्‍थापक परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘वर्ष २०२५ पर्यंत हिंदु राष्‍ट्र येईल’, असे सांगितले आहे. हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेच्‍या पूर्वी येणार्‍या वादळाचा सामना करण्‍यासाठी प्रत्‍येक हिंदूने सिद्ध व्‍हावे. आता विचार करण्‍याची नव्‍हे, तर कृती करण्‍याची वेळ आली आहे. आता हिंदु राष्‍ट्र स्‍थापन करण्‍याची वेळ जवळ आली आहे. त्‍यामुळे हिंदूंनो, उठा ! धर्मकार्याला प्रारंभ करा. हिंदूंचे संख्‍याबळ निर्माण करण्‍यासाठी आम्‍ही सिद्ध आहोत. भारताला अखंड हिंदु राष्‍ट्र बनवण्‍यापासून आम्‍हाला कुणीही रोखू शकत नाही, असे वीरश्रीयुक्‍त उद़्‍गार तेलंगाणा येथील भाजपचे आमदार टी. राजासिंह यांनी काढले. रामनाथी, गोवा येथे दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनात ‘सर्व समस्‍यांचा प्रतिकार करून हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेचा संकल्‍प करा’, या विषयावर मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या वेळी व्‍यासपिठावर अमरावती येथील कौंडण्‍यपूर येथील श्री रुक्‍मिणी वल्लभपिठाचे अनंत विभूषित श्री जगद़्‍गुरु रामानंदचार्य श्री स्‍वामी रामराजेश्‍वराचार्यजी सरकारजी, ‘पितांबरी’ उद्योग समुहाचे संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई, हिंदु जनजागृती समितीचे पूर्व उत्तरप्रदेश आणि बिहार राज्‍य समन्‍वयक श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी आणि बेंगळुरु (कर्नाटक) येथील स्‍वर्णभूमी गोशाळेचे संस्‍थापक अध्‍यक्ष श्री. राघवेंद्र डी. एस्.  उपस्‍थित होते.
आमदार टी. राजासिंह पुढे म्‍हणाले, ‘‘भारताच्‍या स्‍वातंत्र्यासाठी लढा देणारे भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले, त्‍याप्रमाणे हिंदु राष्‍ट्रासाठी समर्पित होऊन कार्य करणार्‍यांचे नावही इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. ‘आपल्‍याला काही होणार नाही’, या विचारात हिंदूंनी राहू नये. हिंदूंनी आत्‍मरक्षणासाठी सिद्ध व्‍हावे. देहली येथील दंगलीच्‍या वेळी ‘पॉप्‍युलर फ्रंट आफ इंडिया’ या धर्मांध संघटनेच्‍या कार्यकर्त्‍यांनी हिंदूंवर आक्रमण केले. केरळ आणि कर्नाटक येथेही हिंदूंवर आक्रमणे होत आहेत. हिंदूंनीही काळानुसार पालटणे आवश्‍यक आहे. भारतात ३० कोटी मुसलमान आहेत. ‘ज्‍या देशात मुसलमानांची संख्‍या ३० टक्‍क्‍यांहून अधिक होते, तेथे पुढील १०-१५ वर्षांत ते इस्‍लामिक राष्‍ट्र होते’, हा इतिहास आहे. हिंदु पालक ‘पाल्‍याने अलिशान बंगला बांधावा’, ‘अधिवक्‍ता बनावे’ आदी स्‍वप्‍ने बाळगतात; परंतु जेव्‍हा धर्मांध आक्रमण करतील, तेव्‍हा त्‍यांचा काय उपयोग ? ‘लव्‍ह जिहाद’च्‍या माध्‍यमातून हिंदु युवतींचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर चालू आहे. हे रोखण्‍यासाठी हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांनी स्‍वत:ची शक्‍ती वाढवायला हवी. उत्तरप्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांनी धर्मांधांवर वचक निर्माण केला. येणार्‍या काळात योगी आदित्‍यनाथ यांच्‍याप्रमाणे विचार असलेले नेते निर्माण होणे आवश्‍यक आहे. विविध हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांनी अहंकार त्‍यागून हिंदूहिताचे कार्य करणे आवश्‍यक आहे.’’

‘अखंड हिंदु राष्‍ट्र’ हेच माझे माझे भविष्‍य !

राजकारण हे माझे भविष्‍य नाही. ‘अखंड हिंदु राष्‍ट्र’ हेच माझे भविष्‍य आहे. हिंदूंच्‍या मतांमुळेच मी वर्ष २०१४ मध्‍ये आमदार झालो. हिंदुत्‍वासाठी कार्य करत असल्‍याचा हा परिणाम आहे. ‘जे हिंदुहितासाठी कार्य करतील, तेच या देशावर राज्‍य करतील’, असे आमदार टी. राजासिंह यांनी सांगितले.

अखंड हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना करतील, अशा नेत्‍यांनाच संसदेत पाठवा !

‘हिंदूंसाठी कार्य केल्‍यास मुलसमान नाखुश होतील, मतदान करणार नाहीत’, अशी हिंदु नेत्‍यांची मानसिकता झाली आहे. ही मानसिकता घालवायला हवी. हिंदूंच्‍या हितासाठी काम करणार्‍या नेत्‍यांनाच विधीमंडळ आणि संसदेत पाठवा. अखंड हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना करतील, अशा नेत्‍यांनाच संसदेत पाठवा’, असेही आवाहन टी. राजासिंह यांनी केले.

अधिवेशनाला श्री स्‍वामी श्री जगद़्‍गुरु रामराजेश्‍वराचार्यजी महाराज यांची वंदनीय उपस्‍थिती !

दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाला महाराष्‍ट्रातील अमरावती येथील कौंडण्‍यपूर येथील श्री रुक्‍मिणी वल्लभपिठाचे अनंत विभूषित श्री जगद़्‍गुरु रामानंदचार्य श्री स्‍वामी रामराजेश्‍वराचार्यजी सरकारजी महाराज यांची वंदनीय उपस्‍थिती लाभली. हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय मार्गदर्शक सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा सन्‍मान केला.

हिंदु जनजागृती समितीविषयी आमदार टी. राजासिंह यांनी काढलेले गौरवोद़्‍गार !

१. हिंदु जनजागृती समितीच्‍या कार्यकर्त्‍यांमध्‍ये शक्‍ती आणि भक्‍ती आहे. येणार्‍या काळात शक्‍ती आणि भक्‍ती यांद्वारे धर्मावरील आघात रोखण्‍याची त्‍यांची क्षमता आहे, हे मी स्‍वत: अनुभवले आहे. हिंदु जनजागृती समितीचे कार्य मी पाहिले आहे.

२. हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाच्‍या माध्‍यमातून हिंदूंमध्‍ये नवशक्‍ती निर्माण झाली आहे. अशा प्रकारे विविध राज्‍ये आणि जिल्‍हे यांमध्‍ये अधिवेशने होत आहेत. अखंड हिंदु राष्‍ट्रासाठी ही संमेलने होत आहेत.

३. अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाचे व्‍यासपीठ हे सर्व हिंदुत्‍वनिष्‍ठांचे व्‍यासपीठ आहे. या व्‍यासपिठावरूनच मी बोलण्‍यास शिकलो. यापूर्वी मला विविध कार्यक्रमांत मागच्‍या रांगेत बसवले जायचे; परंतु या व्‍यासपिठावरून बोलायला लागल्‍यावर आता अन्‍य कार्यक्रमांमध्‍ये पण मला प्रथम रांगेत बसवले जाते.

हिंदूंमध्‍ये हिंदु राष्‍ट्राचा विचार निर्माण करण्‍याचे श्रेय परात्‍पर गुरु डॉ. आठवले आणि हिंदु जनजागृती समिती यांना जाते !

‘अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनातून समस्‍त हिंदूंना नवी ऊर्जा मिळत आहे. या ऊर्जेतून आपल्‍या राज्‍यात जाऊन हिंदुत्‍वनिष्‍ठ कार्य करत आहेत. यापूर्वी हिंदू ‘भारत हिंदु राष्‍ट्र होईल’, असा विचार करत नव्‍हते. ‘भारत देश हिंदु राष्‍ट्र व्‍हावा’, असा विचार हिंदूंमध्‍ये निर्माण झाला, त्‍याचे श्रेय परात्‍पर गुरु डॉ. आठवले आणि हिंदु जनजागृती समिती यांचे आहे’, असे गौरवोद़्‍गार आमदार टी. राजा सिंह यांनी काढले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *