Menu Close

अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी हिंदुत्वनिष्ठांचे अनुभवकथन

डावीकडून श्री. राजीव शाह, डॉ. सूरज काणेकर, डॉ. उदय देशमुख आणि  श्री. विनोद यादव

‘हिंदु राष्‍ट्रासाठी कार्य करणार्‍यालाच मतदान करू’, असे लोकप्रतिनिधींना ठामपणे सांगा ! – राजीव शाह, अध्‍यक्ष, सायबर सिपाही (दक्षिण राज्‍य) भाग्‍यनगर, तेलंगाणा

राजीव शाह, अध्‍यक्ष, सायबर सिपाही (दक्षिण राज्‍य) भाग्‍यनगर, तेलंगाणा

रामानाथी (गोवा) : हिंदूंच्‍या हातून सर्वप्रकारचे रोजगार निघून जात आहेत. आज अनेक ठिकाणी हिंदु फळविक्रेते दिसत नाहीत. ही स्‍थिती पालटण्‍यासाठी आम्‍ही ‘H2H’ मोहीम चालू केली असून आम्‍हाला चांगले यश प्राप्‍त होत आहे. याद्वारे अधिकाधिक हिंदूंमध्‍ये व्‍यापारी क्षेत्राविषयी जागृती निर्माण होऊन ते व्‍यापाराकडे वळत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना संत रामदास स्‍वामी यांचे मार्गदर्शन लाभले; मात्र सध्‍याच्‍या लोकप्रतिनिधी कोणत्‍याही संत-महात्‍म्‍यांचे मार्गदर्शन घेत नाही. संत-महात्‍म्‍यांचे मार्गदर्शन लाभल्‍यानेच खरा विकास करणे शक्‍य आहे. ‘जो हिंदु राष्‍ट्रासाठी कार्य करील, त्‍यालाच मतदान करू’, असे लोकप्रतिनिधींना ठामपणे सांगितले पाहिजे, असे प्रतिपादन भाग्‍यनगर, तेलंगाणा येथील ‘सायबर सिपाही’चे अध्‍यक्ष श्री. राजीव शाह यांनी येथे केले.

रामनाथी (गोवा) येथे चालू असलेल्‍या दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनात १७ जून या दिवशी बोलत होते. या वेळी व्‍यासपिठावर सुराज्‍य संग्राम संघटनेचे अध्‍यक्ष डॉ. सूरज काणेकर, गोवा राज्‍यातील ‘समर्थ भारत’ संघटनेचे सहसंस्‍थापक डॉ. उदय देशमुख, बेंगळुरु (कर्नाटक) ‘स्‍वर्णभूमी गोशाळे’चे संस्‍थापक अध्‍यक्ष श्री. राघवेंद्र डी.एस्., जबलपूर (मध्‍यप्रदेश) ‘हिन्‍दू धर्मसेना’ संस्‍थापक श्री. योगेश अग्रवाल, भोपाळ (मध्‍यप्रदेश) येथील ‘धर्मरक्षक’ संघटनेचे संस्‍थापक श्री. विनोद यादव हे मान्‍यवर उपस्‍थित होते.

अधिकाधिक हिंदू व्‍यापारी क्षेत्रात आल्‍यास ‘फळ जिहाद’वर निर्बंध आणणे शक्‍य ! – डॉ. सूरज काणेकर, अध्‍यक्ष, सुराज्‍य संग्राम संघटन, गोवा

डॉ. सूरज काणेकर, अध्‍यक्ष, सुराज्‍य संग्राम संघटन, गोवा

गोमातेपासून समाजाला अनेक लाभ असूनही गोमातेला पद्धतशीरपणे हिंदूंच्‍या जीवनातून बाजूला केले जात आहे. मी स्‍वत: ‘अ‍ॅलोपॅथी डॉक्‍टर’ असूनही त्‍याविषयी अभ्‍यास करतांना माझ्‍या लक्षात आले की, ‘अ‍ॅलोपॅथी हा केवळ आर्थिक खेळ आहे.’ स्‍वत:ला निरोगी ठेवायचे असल्‍यास योगाचे प्रशिक्षण घेणेच आवश्‍यक आहे. लोकांना स्‍वदेशी वस्‍तू मिळाव्‍यात यासाठी आम्‍ही दुकान चालू केले, तसेच गीर गायीच्‍या सव्‍वादोन लाख लिटर दूधाचा व्‍यवसाय चालू केला. अधिकाधिक हिंदू व्‍यापारी क्षेत्रात उतरल्‍यास ‘फळ जिहाद’वर निर्बंध आणता येईल.

हिंदूंना आर्थिक सक्षम करणारी अर्थव्‍यवस्‍था निर्माण करण्‍याचा आमचा निश्‍चय ! – डॉ. उदय देशमुख, सहसंस्‍थापक, समर्थ भारत, गोवा

डॉ. उदय देशमुख, सहसंस्‍थापक, समर्थ भारत, गोवा

कोरोनाच्‍या कालावधीत गोवा येथे नाक्‍यानाक्‍यावर फळे-भाज्‍या यांची अन्‍य पंथियांची दुकाने चालू झाल्‍याचे आम्‍हाला आढळून आले. ‘ज्‍यांना यापूर्वी कधी परिसरात पाहिले नव्‍हते’, असे लोक ही दुकाने चालवत होते. यामुळे पैसे अन्‍य धर्मियांच्‍या खिशात पैसे जातात. हे रोखण्‍यासाठी कोरोनाच्‍या कालावधीत आम्‍ही ‘समर्थ भारत’ ही एक चळवळ चालू केली. कोरोनाच्‍या दुसर्‍या लाटेत गोवा येथे आम्‍ही ‘समर्थ भारत’चे ठिकठिकाणी ४४ स्‍टॉल (वितरण कक्ष) चालू केले. यामुळे अन्‍य धर्मियांकडून खरेदी करावे लागणार्‍या साहित्‍यासाठी हिंदूंना पर्याय उपलब्‍ध झाला. आम्‍ही थेट शेतकर्‍यांकडून फळे, भाज्‍या खरेदी करून ग्राहकांना विकतो. यामध्‍ये सर्वजण हिंदू आहेत. हिंदूंना प्राप्‍त होणार्‍या पैशातून काही धन तरी राष्‍ट्रकार्यासाठी वापरले जाईल. आपल्‍या गावात, शहरात अशा प्रकारे स्‍टॉल चालू करावयाचे असल्‍यास त्‍यांना ‘समर्थ भारत’ साहाय्‍य करेल, असे आवाहन ‘समर्थ भारत’चे सहसंस्‍थापक डॉ. उदय देशमुख यांनी केले. ‘फळ जिहादला उत्तर : हिंदु युवकांसाठी रोजगारनिर्मिती’ या विषयावर ते बोलत होते.

गायींचे संरक्षण करण्‍यासाठी प्रत्‍येक हिंदूने शपथ घेतली पाहिजे ! – श्री. राघवेंद्र डी.एस्., संस्‍थापक अध्‍यक्ष, स्‍वर्णभूमी, गोशाळा, बेंगळुरू, कर्नाटक

श्री. राघवेंद्र डी.एस्., संस्‍थापक अध्‍यक्ष, स्‍वर्णभूमी, गोशाळा, बेंगळुरू, कर्नाटक

‘गोरक्षण अर्थात् गाय आधारित अर्थव्‍यवस्‍था’ या विषयावर बोलतांना कर्नाटक राज्‍यातील बेंगळुरू येथील स्‍वर्णभूमी गोशाळेचे संस्‍थापक अध्‍यक्ष श्री. राघवेंद्र डी.एस्. म्‍हणाले की, मी गोशाळा निर्माण केली असून त्‍यामध्‍ये ४०० देशी गायींचे पालन करतो. माझ्‍याकडे बंगला आणि पैसा नाही; मात्र ४०० गायी आहेत. मी १ सहस्र गायींचे पालन करायचा विचार करत आहे. भारतात गायींचे पालन पुष्‍कळ प्रमाणात करायला हवे. आपण गायींचे पालन केले नाही, तर सृष्‍टी वाचणार नाही. प्रत्‍येक हिंदूने एक गाय पाळली पाहिजे. गायींना कत्तलीसाठी पशूवधगृहात पाठवू नका. दीक्षा घेऊन गायींचे पालन करा. गायीचे गोमूत्र आणि शेण यांपासून दंतमंजन आणि अनेक वस्‍तू यांचे उत्‍पादन करू शकतो. विदेशातील गायींचे दूध पिण्‍याऐवजी आपल्‍या देशी गायींचे दूध प्रतिदिन प्‍यावे. ते पौष्‍टिक आहे. प्रतिदिन गायींच्‍या शेणाचा इंधन म्‍हणून वापर केल्‍यास परदेशातून इंधन आयात करावे लागणार नाही. त्‍यातून पुष्‍कळ प्रमाणात पैशाची बचत होऊ शकते. देश स्‍वातंत्र्य झाल्‍यानंतर देशात ७०४ कोटी गायींची संख्‍या होती. आता देशात केवळ १५ कोटी गायी शिल्लक आहेत. गायींमुळे समाज रोगमुक्‍त होऊ शकतो.  देशी गायींचे पालन करण्‍यासाठी सरकारकडून अनुदान मिळते. गायींमध्‍ये श्री महालक्ष्मीसह इतर देवतांचा वास असतो. त्‍यामुळे गायींचे संरक्षण करण्‍यासाठी प्रत्‍येक हिंदूने शपथ घेतली पाहिजे.

ईश्‍वर हिंदुत्‍वाच्‍या कार्यातील अडथळे दूर करतो, याची अनुभूती घेतली ! – श्री. योगेश अग्रवाल, संस्‍थापक, हिंदु धर्मसेना, जबलपूर, मध्‍यप्रदेश

श्री. योगेश अग्रवाल, संस्‍थापक, हिंदु धर्मसेना, जबलपूर, मध्‍यप्रदेश

जबलपूर येथे मी लव्‍ह जिहाद आणि धर्मांतर यांविषयी जनजागृती करण्‍यासाठी कार्यक्रम आयोजित करतोे. त्‍यांना धर्मप्रेमींचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. आपण हिंदुत्‍वाचे कार्य करत असतांना ईश्‍वर आपल्‍या कार्यातील अडथळे दूर करत असतो. याचा अनुभव मी घेतला आहे. जबलपूर येथे भाग्‍यनगर (तेलंगाणा) येथील भाजपचे आमदार टी. राजासिंह यांची सभा आयोजित केल्‍यानंतर पाऊस पडत होता. वीजही गेली होती; मात्र आम्‍ही ईश्‍वराला प्रार्थना केल्‍यानंतर आमच्‍या कार्यातील अडथळे दूर होऊन सभा निर्विघ्‍नपणे पार पडली.

हिंदु युवतींना धर्मशिक्षण दिल्‍यासच खर्‍या अर्थाने ‘लव्‍ह जिहाद’ रोखणे शक्‍य ! – श्री. विनोद यादव, संस्‍थापक, धर्मरक्षक, भोपाळ (मध्‍यप्रदेश)

श्री. विनोद यादव, संस्‍थापक, धर्मरक्षक, भोपाळ (मध्‍यप्रदेश)

देशात दहशतवाद, आतंकवाद, भ्रष्‍टाचार, दरोडे आदी वाढत असतांना पोलीस ते सोडून हिंदु संघटनांच्‍या हालचालींकडे लक्ष ठेऊन आहेत, हे हिंदूंचे दुर्देव आहे. भोपाळमध्‍ये हिंदु देवतांविषयी खोटा प्रसार करून हिंदूंचे  धर्मांतर केले जात आहे. याविषयी आम्‍ही घेत असलेल्‍या हिंदूंच्‍या जनजागृतीपर बैठकांमुळे हिंदूंमध्‍ये जागृती होत आहे. हिंदु राष्‍ट्राच्‍या निर्मितीसाठी सर्वांना स्‍वत:मध्‍ये धार्मिकता निर्माण करावी लागेल. मध्‍यप्रदेशमध्‍ये मुसलमानांची संख्‍या हिंदूंच्‍या बरोबरीने होण्‍याची स्‍थिती निर्माण झाली आहे. मध्‍येप्रदेशमधील गरीब घरातील मुली आणि महिला मोठ्या प्रमाणात ‘लव्‍ह जिहाद’ला बळी पडत आहेत. हिंदु युवतींना धर्मशिक्षण दिल्‍यासच खर्‍या अर्थाने ‘लव्‍ह जिहाद’ रोखता येऊ शकतो.

या सत्राची झलक

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *