Menu Close

मालदीवमध्ये मुसलमानांनी योग दिनाच्या कार्यक्रमात केली तोडफोड !

भारत शासनाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी लोकांना हाकलण्याचा केला प्रयत्न !

माले (मालदीव) – येथील नॅशनल फूटबॉल स्टेडियममध्ये भारत शासनाकडून २१ जून या दिवशी जागतिक योगदिनाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित केला होता. त्या वेळी जिहादी मुसलमानांच्या जमावाने स्टेडियममध्ये घुसून तेथे तोडफोड केली. तसेच येथे योगासने करणार्‍यांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. नंतर बळाचा वापर करून त्यांच्यावर नियंत्रण मिळवले.

 

याविषयी मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम महंमद सोलिह यांनी ट्वीट करून सांगितले की, या घटनेची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. याला उत्तरदायी असणार्‍यांना कठोर शिक्षा केली जाईल. याकडे आम्ही गांभीर्याने पहात आहोत.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *