उज्जैन : उज्जैन सिंहस्थ क्षेत्री सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून लावण्यात आलेल्या प्रदर्शनाचे दिशा या दूरचित्रवाहिनीकडून चित्रीकरण करण्यात आले. या वेळेस त्यांनी पूर्ण प्रदर्शनाचे चित्रीकरण केल्यावर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांची मुलाखत घेऊन प्रदर्शनामागील उद्देश जाणून घेतला.
प्रदर्शनाविषयी माहिती सांगतांना पू. डॉ. चारुदत्त पिंगळे म्हणाले, मुळात धर्म आचारमूलक आहे. त्यामुळे सिंहस्थात येणार्या भाविकांना येथे धर्माचे आचरण कसे करावे ? काय करावे, काय करू नये ? तसेच सनातन धर्म काय आहे, त्यात सांगितलेले दैनंदिन धर्माचरण, पूजाविधी यांचे महत्त्व काय, ते कळावे म्हणून या प्रदर्शनाचे आयोजन केले गेले आहे. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे हिंदू बहुसंख्यांक असूनही निधर्मी लोकशाही असलेल्या भारतात त्यांच्या हिताचे रक्षण होत नाही. हिंदुहितरक्षण करणारे हिंदु राष्ट्र कसे असेल, याविषयी माहिती सांगणारे फ्लेक्स फलक लावण्यात आलेले आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात