Menu Close

मुसलमान किन्नराकडून मौलवीच्या साहाय्याने हिंदु किन्नराचे धर्मांतर !

मुसलमान किन्नराने मौलवीच्या साहाय्याने हिंदु किन्नराचे केले धर्मांतर !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथे एका हिंदु किन्नराचे अन्य एका मुसलमान किन्नराने मौलवीच्या साहाय्याने धर्मांतर केल्याचा आरोप त्याच्या आईने केला आहे. याविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली असून पोलीस या प्रकरणात चौकशी करत आहेत. या वेळी अन्य किन्नर पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने गोळा झाले होते.

१. पंकज असे या किन्नराचे नाव आहे. त्याला मुसलमान किन्नराकडून गुंगीचे औषध पाजून शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यात आला. पंकज याने त्यांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यावर चोरीचा आरोप करून त्याला मारहाण करण्यासह पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला.

२. याविषयी ‘किन्नर कल्याण बोर्ड’नेही हस्तक्षेप करत पोलिसांत तक्रार केली आहे. बोर्डाच्या वैष्णवी नंद गिरि यांनी म्हटले की, आमची मागणी आहे की, आरोपीवर (धर्मांतर करणार्‍यावर) कठोर कारवाई केली पाहिजे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *