Menu Close

कर्नाटकात जनता दलच्या आमदाराने महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर उगारला हात !

सामाजिक माध्यमांतून आमदाराला विरोध

जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे आमदार एम्. श्रीनिवास यांनी एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर उगारला हात

मंड्या (कर्नाटक) – कर्नाटक येथील जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे आमदार एम्. श्रीनिवास यांनी येथील एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर हात उगारल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यामुळे लोक श्रीनिवास यांचा निषेध करत आहेत. श्रीनिवास हे महाविद्यालयाच्या दौर्‍यावर आले होते. तेव्हा संगणक विभागात कार्यरत असलेल्या प्राचार्यांना विचारलेल्या प्रश्‍नाला ते समाधानकारक उत्तर देऊ न शकल्याने श्रीनिवास यांनी त्यांच्यावर हात उगारला.

(सौजन्य : TIMES NOW Navbharat)

सदर व्हिडिओमध्ये श्रीनिवास यांनी प्राचार्यांवर २-३ वेळा हात उगारल्याचे दिसत आहे; परंतु प्राचार्यांना हात लागला की नाही, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. या वेळीही प्राचार्य शांतपणे उभे होते. या प्रकरणी प्राचार्यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट करावी, अशी मागणी केली जात आहे. दुसरीकडे या व्हिडिओवरून आमदार श्रीनिवास यांच्या बाजूने कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *