Menu Close

उदयपूर (राजस्थान) येथे धर्मांधांकडून हिंदु व्यक्तीचा शिरच्छेद

नुपूर शर्मा यांचे समर्थन करणारी पोस्ट प्रसारित केल्याचा परिणाम

  • काँग्रेसच्या राज्यात हिंदू असुरक्षित ! काँग्रेसचे राज्य म्हणजे पाकिस्तानी राजवटच !
  • जमावाकडून मुसलमानांची हत्या झाल्यास हिंदूंना असहिष्णु ठरवणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी आता कुठे आहेत ?
  • अशा घटना हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतात !

उदयपूर (राजस्थान) – येथे १० दिवसांपूर्वी नूपुर शर्मा यांचे समर्थन करणारी पोस्ट सामाजिक माध्यमांतून प्रसारित केल्यामुळे कन्हैयालाल तेली या ४० वर्षीय व्यक्तीची कट्टरतावादी मुसलमानांकडून हत्या करण्यात आली. तेली हे शिवणकाम करण्याचा व्यवसाय करत होते. त्यांच्या दुकानात घुसून मुसलमानांनी तलवारीने त्यांचा शिरच्छेद केला. नंतर संबंधित मुसलमानांनी या हत्येचे दायित्व घेत असल्याची पोस्ट सामाजिक माध्यमांतून प्रसारित केली, तसेच त्यांनी या घटनेचा व्हिडिओही प्रसारित केला.

१. तेली यांचे येथील धानमंडी भागातील भूतमहल परिसरात ‘सुप्रीम टेलर्स’ नावाचे दुकान आहे. कपड्याचे माप देण्याचे निमित्त करून दोन कट्टरतावादी मुसलमान त्यांच्या दुकानात शिरले आणि त्यांनी तेली यांची हत्या केली. त्यानंतर ते पळून गेले.

२. तेली यांनी पोस्ट केल्यापासून त्यांना मुसलमानांकडून ठार मारण्याच्या धमकी मिळत होत्या. याविषयी त्यांनी पोलिसांत तक्रारही प्रविष्ट केली होती. या धमक्यांमुळे त्यांनी त्यांचे दुकानही उघडले नव्हते. १० दिवसानंतर २८ जूनला त्यांनी दुकान उघडल्यावर त्यांची हत्या करण्यात आली.

३. हत्येनंतर येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरातील ५ ठिकाणचे बाजार व्यापार्‍यांकडून बंद करण्यात आले आहेत. पोलिसांनी सांगितले की, आरोपींची ओळख पटली असून त्यांच्या शोधासाठी पथक पाठवण्यात आले आहे.

स्रोत : भास्कर

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *