Menu Close

श्रीरामपूर (जिल्हा नगर) येथे किरकोळ भांडणावरून धर्मांधांकडून दंगल !

  • रस्त्यावर दगडांचा खच

  • काही दुकाने पेटवली

  • परिसरात तणाव

धर्मांधांकडून वारंवार दंगल घडवली जाणे, हे शासनाच्या अस्तित्वावर प्रश्‍न निर्माण करते ! वारंवार होणार्‍या दंगली थांबून समाजात शांतता पसरण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे ! 

dharmandh2श्रीरामपूर : येथील शिवाजी रस्त्यावरील सय्यदबाबा चौकात भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या दुचाकीची एका धर्मांधाच्या मालवाहतूक रिक्शाला धडक झाली. त्यावरून त्या दोघांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर धर्मांधांनी दंगल घडवत दगडफेक केली आणि काही हिंदूंची दुकाने पेटवली. (यावरूनच धर्मांधांची पूर्वसिद्धता आणि त्यांचे दंगल घडवून आणण्याचे पूर्वनियोजन दिसून येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्यामुळे संतप्त झालेल्या काही हिंदूंनीही धर्मांधांना चोख प्रत्युत्तर दिले. ही घटना पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर ८ मेच्या रात्री घडली.

१. या घटनेच्या वेळी रात्री १०.४५ वाजता अनेकांनी पोलीस ठाण्याशी संपर्क केला. त्यानंतर थोड्या वेळाने केवळ ५ पोलीस घटनास्थळी दाखल झाले; परंतु त्यांना जमावाला नियंत्रणात आणता आले नाही. (एवढी मोठी घटना घडत असतांना दंगल आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी आवश्यक तो बंदोबस्त ठेवणे आणि दंगलीवर नियंत्रण आणणे अपेक्षित होते. दंगलीवर नियंत्रण मिळवू न शकणारे पोलीस सशस्त्र आतंकवाद्यांना काय सामोरे जाणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

२. त्यानंतर धर्मांधांनी तोडफोड चालू केली आणि नेहरु भाजी मार्केटसमोरील फळविक्रेत्यांची १० हून अधिक दुकाने दंगलखोरांनी पेटवून दिली. त्याचप्रमाणे सय्यद बाबा दर्ग्याजवळील काही किराणा मालाची दुकाने फोडून लुटण्यात आली. याचसमवेत त्या ठिकाणी असलेली काही वाहने आणि इतरही दुकाने यांना आग लावण्यात आली. अग्नीशमन दलाने घटनास्थळी बंब पाठवून आग विझवली.

३. यानंतर नगर पोलिसांची जादाची कुमक आणि दंगलविरोधी पथक आल्यानंतर दंगल नियंत्रणात आणली. पोलिसांनी काही संशयितांना कह्यात घेतले आहे. श्रीरामपूरचे उपविभागीय दंडाधिकारी प्रकाश थवील, तहसीलदार किशोर कदम, पोलीस निरीक्षक राजेंद्र पडवळ आणि उपनिरीक्षक सुधीर पाटील यांनी दंगलग्रस्त भागाची पाहणी केली.

याला पोलिसांचा उरफाटा न्याय म्हणायचा कि अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण ? भाजप शासनाच्या राज्यात हे अपेक्षित नाही !

दंगलप्रकरणी ८ जणांना अटक, भाजप नेत्यांसह ४३ जणांवर गुन्हा प्रविष्ट

८ मे या दिवशी श्रीरामपूर येथे झालेल्या दंगलीप्रकरणी भाजप जिल्हा सरचिटणीस प्रकाश चित्ते, माजी शहराध्यक्ष मारुती बिंगळे, विहिंपचे विजय जैसवाल यांच्यासह ४३ जणांवर गुन्हा प्रविष्ट झाला आहे. या सर्वांवर दंगल करणे, पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, पोलीस वाहन पेटवण्याचा प्रयत्न करणे असे आरोप लावण्यात आले आहेत. आतापर्यंत पोलिसांनी ८ जणांना अटक केली असून त्यात कोणत्याही धर्मांधांचा समावेश नाही. या दंगलीमध्ये ३ पोलीस अधिकार्‍यांसह ८ पोलीस जखमी झाले, तर सुमारे १ कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी अनिल कवडे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी हे श्रीरामपुरात तळ ठोकून आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *