Menu Close

ऐतिहासिक लढाईतून बोध घेऊन युवा पिढीचे राष्ट्रप्रेम जागृत व्हावे ! – फ्रांसुआ गोतिए, फ्रेंच पत्रकार

पुणे येथे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेवर आधारित चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन !

जिज्ञासूंना प्रदर्शनाची माहिती सांगताना विंग कमांडर श्री. शशिकांत ओक
पुणे – ऐतिहासिक लढाईतून बोध घेऊन युवा पिढीचे राष्ट्रप्रेम जागृत व्हावे, या उद्देशाने विंग कमांडर शशिकांत ओक यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्यावरील प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. हे प्रदर्शन प्रतिदिन सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत चालू रहाणार असून याचा अधिकाधिक जणांनी लाभ घ्यावा. तसेच युवा पिढीने या ऐतिहासिक घटनेतून बोध घ्यावा, असे आवाहन फ्रेंच पत्रकार श्री. फ्रांसुआ गोतिए यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम (वडगाव शिंदे, लोहगाव) येथे २५ जून या दिवशी त्यांच्या हस्ते ‘नरवीर तानाजी मालुसरेंची सिंहगडावरील शौर्यगाथा’ या विषयावरील चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते  दीपप्रज्वलन करून पार पडले. त्या वेळी ते बोलत होते.

दीपप्रज्वलन करतांना श्री. फ्रांसुआ गोतिए

श्री. फ्रांसुआ गोतिए पुढे म्हणाले की, धन आणि योग्य कलाकार मिळवून या संग्रहालयाला हिंदु संस्कृतीचे प्रतीक असलेल्या स्वस्तिकाच्या आकारात आधुनिक सुविधांनी सज्ज करण्याचा संकल्प आहे. परकियांच्या आघातांना शस्त्राने वार करून स्वजनांचे रक्षण करण्यासाठी भवानीमातेने स्वत:ची तलवार छत्रपती शिवाजी महाराजांना प्रदान केली. या संकल्पनेवर आधारित मी एका मंदिराची स्थापना केली आहे.

या कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. पराग आणि सौ. नेहा प्रधान यांच्या हस्ते हवन अन् पूजन करण्यात आले. शशिकांत ओक यांनी ‘नरवीर तानाजी मालुसरेंची सिंहगडावरील शौर्यगाथा’ याविषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री. शशिकांत ओक यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *