Menu Close

सागर (मध्यप्रदेश) येथे भाजपच्या ख्रिस्ती नेत्याने स्वीकारला हिंदु धर्म !

सागर (मध्यप्रदेश) – येथील भाजपचे ख्रिस्ती नेते विविन टोप्पो यांनी हिंदु धर्म स्वीकारला आहे. त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना काही दिवसांपूर्वीच हिंदु धर्म स्वीकारणार असल्याची माहिती देऊन अन्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली होती. विविन यांनी हिंदु धर्म स्वीकारल्याच्या विधीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित करण्यात आला आहे. त्यात ते ‘मला हिंदु धर्म आवडतो. माझे पूर्वजही हिंदु होते. यामुळेच मी हिंदु धर्म स्वीकारला आहे’, असे म्हणतांना दिसत आहेत.

विविन टोप्पो यांनी भाजपकडून सागर जिल्ह्यातील मकरोनिया येथून नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. येथे ६ जुलैला निवडणूक होणार आहे.

Related News

0 Comments

  1. Uma Maheswar Nakka

    What Modi ji alone can decide unless the Indian Defence Chiefs interfere! it is already too late and we need to realise and wake up.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *