बांगलादेशात हिंदु विद्यार्थ्याला मुसलमानांच्या कह्यातून सोडवल्याचा परिणाम
मिर्झापूर (बांगलादेश) – येथील मिर्झापूर युनायटेड कॉलेजमधील हिंदु प्राचार्य स्वप्न कुमार बिस्वास यांना मुसलमानांकडून चपलांचा हार घालून अपमानित करण्याची घटना १७ जून या दिवशी घडल्याची माहिती समोर आली आहे. या वेळी प्राचार्य आणि अन्य दोन शिक्षक यांच्या दुचाकी जाळण्यात आल्या. या घटनेच्या वेळी पोलीस उपस्थित असतांनाही त्यांनी प्राचार्य बिस्वास यांचा बचाव केला नाही. या घटनेनंतर हिंदूंनी रस्त्यावर उतरून निषेध केला. या प्राचार्यांनी काही दिवसांपूर्वी हिंदु विद्यार्थ्याला मुसलमानांच्या जमावाच्या कह्यातून सोडवले होते. याचा राग मनात धरून प्राचार्यांना चपलांचा हार घालण्यात आला. या विद्यार्थ्याने नूपुर शर्मा यांचे छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित केले होते.
Bangladesh: Hindu college principal forced to wear garland of shoes because a Hindu student hailed Nupur Sharma, student arrested and principal goes into hidinghttps://t.co/rsZIf250u1
— OpIndia.com (@OpIndia_com) June 26, 2022
मुसलमानांचा आरोप आहे की, नूपुर शर्मा यांचे छायाचित्र प्रसारित करणार्या हिंदु विद्यार्थ्यांची तक्रार करण्यासाठी प्राचार्य बिस्वास यांच्याकडे गेलो असता त्यांनी पोलिसांना बोलावले. यामुळे आम्हाला राग आला आणि आम्ही त्यांना चपलांचा हार घातला.