तिरुपूर (तमिळनाडू) – येथे एक अवैध मशिदीला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केल्यानंतर मुसलमानांनी येथे ‘रस्ता बंद’ आंदोलन केल्याची घटना घडली. त्यांनी रस्त्यावर नमाजपठण चालू करून रस्ता बंद केला. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली. महसूल विभागाने येथील महालक्ष्मी नगरमध्ये असलेली अवैध मशीद बंद करण्याचा प्रयत्न केला असता ही घटना घडली. ही मशीद गेल्या १० वर्षांपासून येथे आहे. वर्ष २०१६ मध्ये मद्रास उच्च न्यायालयाने महसूल विभागाला ही मशीद बंद करण्याचा आदेश दिला होता; मात्र ते असे करण्यात अपयशी ठरले होते. त्यानंतर न्यायालयाने ३० जून २०२२ या दिवसापर्यंत मशीद बंद करण्याची समयमर्यादा दिली होती.
महसूल विभागाचे अधिकारी मशीद बंद करण्यासाठी गेले असता ३०० हून अधिक मुसलमानांनी तिरुपूर नगरपरिदेच्या कार्यालयाबाहेर रस्ता बंद आंदोलन चालू केले. यासह त्यांनी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली. त्यावर न्यायालयाने ४ जुलैपर्यंत मार्ग काढण्याचा आदेश दिला.
Muslims bring city to a standstill against sealing of illegal mosque, DMK MLA extends support https://t.co/OHmgukFB79
— HinduPost (@hindupost) July 2, 2022
मुसलमानांच्या आंदोलनाच्या वेळी मूकदर्शक पोलिसांच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांचेही ‘रस्ता बंद’ आंदोलन !
मुसलमानांच्या आंदोलनाच्या वेळी पोलीस मूकदर्शक राहिल्याच्या विरोधात हिंदु मुन्नानी (हिंदू आघाडीवर) संघटनेनेही ‘रस्ता बंद’ आंदोलन केले. (कायदाद्रोही मुसलमान कायदा हातात घेऊन आंदोलन करत असतांना त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करणार्या पोलिसांना हिंदूंनी कर भरून कशाला पोसायचे ? – संपादक दैनिक सनातन प्रभात) सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रविड प्रगती संघ) पक्षाच्या स्थानिक आमदाराचे मुसलमानांना समर्थन असल्याचा आरोप करत हिंदु मुन्नानीने मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पत्र लिहिले आहे.