Menu Close

(म्हणे) ‘चित्रपटात नंबी नारायणन् यांना जरा अधिकच राष्ट्रवादी दाखवण्यात आले आहे !’

रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ चित्रपट राष्ट्रवादावर आधारित असल्याने हिंदुद्रोही चित्रपट समीक्षक अनुपमा चोपडा यांना पोटशूळ !

 

मुंबई – ‘इस्रो’ या ‘भारतीय अनुसंधान संशोधन संस्थे’चे प्रसिद्ध वैज्ञानिक आणि ‘पद्मभूषण’ पुरस्कार प्राप्त नंबी नारायणन् यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ सर्वत्र गाजत आहे. चित्रपट समीक्षक अनुपमा चोपडा यांना मात्र या चित्रपटावरून पोटशूळ उठलेला दिसून येतो. ‘चित्रपटातून नंबी नारायणन् यांना जरा अधिकच राष्ट्रवादी दाखवण्यात आले आहे’, असे चोपडा म्हणाल्या. ‘चित्रपटातून वारंवार नारायणन् यांचा धर्म दाखवण्यात आला आहे’, अशी टीकाही चोपडा यांनी केली. (हिंदूंच्या देशात चित्रपटात एखाद्याला ‘धार्मिक हिंदु’ दाखवल्याने त्यास विरोध होतो, हे हिंदूंसाठी लज्जास्पद ! ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

 

अनुपमा चोपडा यांच्या राष्ट्रघातकी समीक्षणाचा व्हिडीओ पाहण्यासाठी या ट्विटवर क्लीक करा !

आर्. माधवन् यांनी बनवलेल्या या चित्रपटाचे चहुबाजूंनी कौतुक होत असतांना चोपडा यांच्या या प्रतिक्रियेवर सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. चित्रपटातून नारायणन् महत्त्वपूर्ण प्रसंगांच्या वेळी पूजा-पाठ करणे, प्रार्थना करणे आदी करत असल्याचे दाखवण्यात आल्याने हिंदु धर्माचे माहात्म्य प्रतिपादित केले गेले आहे. एका व्यक्तीने म्हटले की, जर नारायणन् यांना नमाज वाचतांना दाखवण्यात आले असते, तर चोपडा यांनी असाच विरोध केला असता का ?

अनुपमा चोपडा यांचा हिंदुद्रोही इतिहास !

१. अनुपमा चोपडा यांनी दोन मासांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘आर्.आर्.आर्.’ या चित्रपटावरही आक्षेप घेतला होता. हा चित्रपट जगभरात गाजला; परंतु चोपडा यांनी या हा चित्रपट ‘हिंदुत्ववादी’ असल्याचा आरोप केला होता.

२. मार्च २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावरही चोपडा यांनी काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाचे वास्तव नाकारले होते आणि ‘चित्रपट केवळ एक नाटक आहे’, असे म्हटले होते.

३. अनुपमा चोपडा या हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध; परंतु हिंदुद्रोही दिग्दर्शक विधू विनोद चोपडा यांच्या पत्नी आहेत. विधू विनोद चोपडा यांनी हिंदु देवतांचे विडंबन करणारा ‘पीके’ हा चित्रपट बनवला होता, तसेच ‘शिकारा’ या त्यांच्या चित्रपटाला प्रेमकथेचे रूप देऊन काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाला एक विनोद म्हणून रेखाटण्यात आले होते.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *