-
हिंदूंना लक्ष्य करण्याचे प्रशिक्षण !
-
‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या ३ नेत्यांना अटक
निझामाबाद (तेलंगाणा) – येथील पोलिसांनी जिहादी आतंकवादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) या संघटनेच्या ३ नेत्यांना अटक केली आहे. या तिघांनी जिल्ह्यात कराटे प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली मुसलमान तरुणांना शस्त्रास्त्रे चालवणे आणि लोकांवर आक्रमण करणे याचे प्रशिक्षण देण्यासाठी ठिकठिकाणी शिबिरे आयोजित केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणांना हिंदूंना लक्ष्य करण्याचे प्रशिक्षण दिले जात होते.
Nizamabad: 52 year old Abdul Khader, a karate teacher arrested for terror activities.
He was training muslim youth from Andhra Pradesh and Telengana in Rioting,
Stone-Pelting and Killing of Kafirs. pic.twitter.com/NtM0PkOxYQ
— सत्येन्द्र तिवारी,VHP (प्रतापगढ़ी)?…..✍️ (@Satyendra_VHP) July 6, 2022
१. या तिन्ही जिहाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या शस्त्रांचा वापर प्रशिक्षण शिबिरांमध्ये केला जात होता. या तिघांच्या चौकशीमध्ये आणखी ३० जणांची माहिती मिळाली असून त्यांनाही अटक करण्यात येणार, असे पोलिसांनी सांगितले.
२. पोलीस आयुक्त के.आर्. नागराजू यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी बंदी घातलेल्या ‘सीमी’ या आतंकवादी संघटनेचे नेते पॉप्युलर ऑफ इंडियामध्ये सक्रीय झाले आहेत. ठिकठिकाणी ते कराटे शिबिर आयोजित करतात; मात्र कराटेचा यात काहीच संबंध नसतो. यात स्थानिक भागातील मुसलमान तरुणांना मोठ्या संख्येने बोलावून त्यांना शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांना इतर धर्मियांवर कसे आक्रमण करून स्वतःचे प्रभुत्व कसे निर्माण करायचे हे शिकवले जात.
३. या शिबिरांमध्ये जे इस्लाम आणि पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने करतात त्यांना धडा शिकवण्याचेही प्रशिक्षण दिले जाते. पॉप्युलर ऑफ इंडियाने अशा प्रकारच्या शिबिरांचे एक जाळे निर्माण केले आहे. यात आतापर्यंत सहभागी झालेल्या २०० लोकांची माहिती मिळाली आहे. या कल्पनेमागे ५२ वर्षांचा अब्दुल कादिर आहे. तो मुसलमान भागांमध्ये जाऊन तरुणांचा बुद्धीभेद करतो आणि त्यांना शिबिरात घेऊन येतो.