ढाका – बांगलादेशच्या चित्तगाँग जिल्ह्यातील अन्वरमध्ये ओरी चक्रवर्ती नावाच्या एका अल्पवयीन शाळकरी हिंदु मुलीचे अपहरण करून बलपूर्वक धर्मांतर केल्याची घटना नुकतीच घडली. १६ नोव्हेंबर या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता ओरी आपल्या घराजवळच्या मंदिराकडे निघाली असता महंमद निजाम आणि महंमद मूसा नावाच्या दोन मुसलमानांनी तिला गाडीत घालून पळवून नेले. ओरीने आरडाओरड केली; परंतु कोणीही तिच्या साहाय्याला आले नाही. धर्मांधांनी ओरीला अज्ञातस्थळी नेऊन तिचे बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर केल्याचे वृत्त आहे. याविषयी मुलीचे वडील पोलीस ठाण्यात तक्रार करायला गेले होते; पण त्यांची तक्रार स्वीकारण्यास पोलिसांनी नकार दिला. त्यांची मुलगी इस्लाममध्ये धर्मांतरित झाली असून तिने मुसलमान मुलाशी विवाह केला आहे, अशी माहिती त्यांना पोलिसांकडून मिळाली. मुलीच्या वडिलांनी इतर कुठलाच पर्याय नसल्याने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशावरून पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे. या प्रकरणी बांगलादेश मायनॉरिटी वॉचने वरिष्ठ पोलीस अधिकार्यांशी संपर्क साधला असून मुलीच्या सुटकेची मागणी केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात