- अजमेर येथील गौहर चिश्तीने नूपुर शर्मा यांचा शिरच्छेद करण्याची चिथावणी दिल्याचा परिणाम !
- पाठ फिरवणारे बहुतांश हिंदू असल्याचे आले समोर !
‘हिंदू संघटित झाले, तर ते काय करू शकतात ?’, याचे हे उदाहरण ! हिंदूंच्या परिणामकारक संघटनामुळे हिंदूंच्या बर्याच समस्या सुटतील, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
अजमेर (राजस्थान) – एरव्ही येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या प्रसिद्ध ‘अजमेर-शरीफ’दर्ग्याला (दर्गा म्हणजे मुसलमान संतांचे थडगे) सहस्रोंच्या संख्येने लोक भेट देतात; मात्र ही संख्या न्यून झाल्याने व्यापार्यांना फटका बसला आहे. शहरातील विश्रामगृहांची कमाई ९० टक्क्यांनी घटली असून उपाहारगृहांनाही कोट्यवधी रुपयांच्या हानीला सामोरे जावे लागले आहे. दर्ग्याला भेट देणार्यांमध्ये हिंदूंची संख्या अधिक आहे. आता त्याला भेट देणार्या हिंदूंचीच संख्या अल्प झाल्याने त्याचा फटका व्यापार्यांना बसला आहे.
नूपुर शर्मा यांच्या विरोधात येथील दर्ग्यातील किमान ३ खादिमांनी (सेवेकर्यांनी) भडकावणारी विधाने केल्यानेच, तसेच उदयपूर येथील कन्हैयालाल यांचा शिरच्छेद करणारे जिहादी हे दर्ग्याच्या सेवेकर्यांशी संबंधित असल्याचे समोर आल्यामुळे हिंदूंनी अजमेर दर्ग्याकडे पाठ फिरवल्याचे म्हटले जात आहे. एका दुकानदाराच्या मते अजमेर येथील व्यापार्यांना किमान ५० कोटी रुपयांची आर्थिक हानी सोसावी लागली आहे.
अजमेर के दरगाह में खादिमों के भड़काऊ बयान के बाद जुमे को भी सन्नाटा, 90% घट गई रेस्टॉरेंट्स की कमाई, होटलों की … https://t.co/6RMK0KCmZ0
— The News (@TheNews_HDV) July 9, 2022
हिंदूंच्या विरोधातील वक्तव्यांमुळे लोकांनी फिरवली पाठ ! – ‘जन्नत ग्रुप ऑफ होटल्स’चे मालक
दर्गा क्षेत्रातील ‘जन्नत ग्रुप ऑफ होटल्स’चे मालक रियाज खान यांनी दिलेल्या माहितीनुसार चिश्तींकडून करण्यात आलेल्या अयोग्य वक्तव्यांमुळे येथील गर्दी अल्प झाली आहे. तसे पाहिले, तर उदयपूर येथील हत्याकांडानंतरच लोकांचे हॉटेलमध्ये आरक्षण (अॅडवान्स बुकींग) करण्याचे प्रमाण उणावले आहे. ‘सोहन हलवा’ या खाद्यपदार्थासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘ख्वाजा गरीब नवाज स्वीट्स’चे मालक शदभ सिद्दीकी यांनी त्यांची कमाई ९० टक्क्यांनी घटल्याचे सांगितले.
स्रोत : सनातन प्रभात