-
केरळमधील माकपच्या कार्यकर्त्याच्या हत्येचे प्रकरण
-
सत्र न्यायालयाने दिली होती जन्मठेपेची शिक्षा !
थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळ उच्च न्यायालयाने १ एप्रिल २००८ या दिवशी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता विष्णु याच्या हत्येच्या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १३ स्वयंसेवकांची निर्दोष सुटका केली. सत्र न्यायालयाने वर्ष २०१६ मध्ये या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
2008 में विष्णु की हत्या, 2016 में RSS के 13 कार्यकर्ता को गुनाहगार बता सुनाई सजा: 2022 में केरल हाई कोर्ट में पूरी कहानी ही निकली फर्जी, सारे बरी#KeralaHC #RSShttps://t.co/SPG50qcuwJ
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 13, 2022
चौकशी अधिकार्यांनी कथेप्रमाणे घटना सांगून पुरावे आणि साक्षीदार गोळा केले !
न्यायालयाने म्हटले की, हे संपूर्ण प्रकरण राजकीय सूडबुद्धीचे उदाहरण आहे. या प्रकरणात आरोपींना पुराव्याविना अटक करण्यात आली आणि साक्षीदारांना साक्ष देतांना काय सांगायचे हे ठरवून देण्यात आले होते. याद्वारे हा खटला एका वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न झाला. हत्येच्या वेळी मारेकर्यांचे चेहरे झाकलेले होते; मात्र चौकशी अधिकार्यांनी या संदर्भात न्यायालयाला काहीच माहिती दिली नाही. त्यांनी एखाद्या कथेप्रमाणे घटना सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यानुसार पुरावे अन् साक्षीदार यांना गोळा केले.(न्यायालयाने अशा अधिकार्यांवर कारवाई करण्याचा आदेश द्यायला हवा, असेच जनतेला वाटते ! निर्दोषांना गेल्या १४ वर्षांत जे काही भोगावे लागले त्याविषयी त्यांना हानीभरपाई मिळायला हवी. या संदर्भात आता केंद्र सरकारने कायदा करणे आवश्यक आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात )
स्रोत : दैनिक सनातन प्रभात