आज १४ जुलै २०२२ या दिवशी बाजीप्रभु आणि फुलाजीप्रभु देशपांडे बलीदानदिन…
भोर तालुक्यातील (जिल्हा पुणे) हिरडस मावळमधील पिढीजात सरदार म्हणजे बाजीप्रभु देशपांडे. त्यांचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य हेरून छत्रपती शिवाजी महाराज यांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपलेसे करून घेतले. वयाच्या पन्नाशीतही २० ते २२ घंटे अविश्रांत काम करणार्या बाजींचा संपूर्ण मावळ प्रांतात मोठा दबदबा होता. महाराजांपेक्षा वयाने मोठ्या असणार्या बाजीप्रभूंच्या मनात महाराजांविषयी आत्यंतिक भक्तीभाव होता. पन्हाळगडाला शत्रूने वेढा घातलेला असतांना छत्रपतींची त्यातून सुटका करणे आणि महाराजांना विशाळगडापर्यंत पोचवण्याची व्यवस्था करणे, या भूमिका निभावतांना बाजीप्रभूंनी आपले केवळ शौर्यच नव्हे, तर प्राणपणाला लावले. ही घटना आजही स्फुरण देणारी आणि स्वराज्याविषयीचा अभिमान रोमारोमांत भिनवणारी आहे.
(साभार : सामाजिक माध्यम)
स्रोत : दैनिक सनातन प्रभात