उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करण्यात आल्यानंतरही या घटना थांबलेल्या नाहीत. यावरून धर्मांध हे कायद्याला भीक घालत नाहीत, हेच स्पष्ट होते ! त्यामुळे आता अशा प्रकरणात जन्मठेपेसारखी शिक्षा करण्याची तरतूद करण्याची आवश्यकता आहे ! -संपादक, दैनिक सनातन प्रभात
बरेली (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यात यावर्षी जानेवारी २०२२ ते १० जुलैपर्यंत लव्ह जिहादच्या ४६ घटना घडल्या आहेत. याविषयी बाल कल्याण समितीच्या म्हणण्यानुसार या प्रकरणातील बहुतांश मुलींनी सांगितले की, त्यांना अंधारात ठेवण्यात आले आणि त्यांचे बलपूर्वक धर्मांतर करण्यात आले. जिल्ह्यातील एकूण घटनांपैकी २५० हून अधिक अशा घटना आहेत ज्यात मुली अल्पवयीन आहेत. यातील ४६ मुलींना मुसलमान तरुणांनी खोटे सांगून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि नंतर धर्मांतर केले. बरेलीमध्ये प्रत्येक मासाला ‘लव्ह जिहाद’च्या सरासरी ७ घटना घडत आहेत. तसेच सरासरी ५ मुलींना त्यांच्याच घरी चोरी करण्यास बाध्य केले जात आहे.
स्रोत : दैनिक सनातन प्रभात