आता हेच शिल्लक राहिले होते ! हिंदूंना त्यांच्या धर्माप्रमाणे शिक्षक मिळण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
कोटा (राजस्थान) – येथील खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकवण्यात येणार्या पुस्तकावर बजरंग दलाने आक्षेप घेतला आहे. ‘कॉन्व्हेंट शाळेचे इस्लामीकरण करण्यात येत आहे’, असा आरोप बजरंग दलाकडून करण्यात आला आहे. अशा पुस्तकावर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली आहे. या शाळेतील इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांना मुसलमानेतर विद्यार्थ्यांना मदर म्हणजे ‘अम्मी’ आणि फादर म्हणजे ‘अब्बू’ असे म्हणायला शिकवले जात आहे. या पुस्तकाचे नाव ‘गुलमोहर’ आहे. भाग्यनगर येथील प्रकाशकाने ते प्रकाशित केले असून ११३ पानांच्या या पुस्तकाचे मूल्य ३५२ रुपये आहे. याविषयी पालकांकडून तक्रार करण्यात आलेली नाही; मात्र बजरंग दलाने शिक्षण विभागाच्या उपसचिवांकडे तक्रार केली आहे.
राजस्थान : स्कूल में बच्चों को सिखाया जा रहा 'अब्बू-अम्मी' बोलना:
कोटा के प्राइवेट स्कूल की बुक में उर्दू के शब्दों से मचा बवाल@kj_srivatsan pic.twitter.com/Z7WkgsxaZO
— News24 (@news24tvchannel) July 15, 2022
१. पुस्तकातील दुसर्या धड्याला ‘ग्रांडपा फारूक’स गार्डन’ (आजोबा फारूक यांची बाग)’ असे शीर्षक आहे. ६ व्या धड्यामध्ये पालक स्वयंपाकघरात असून ‘ते बिर्यानी बनवत आहेत’, असे म्हटले आहे. यातून मुलांना मांसाहारी जेवण खाण्याविषयी सांगितले जात आहे.
२. याविषयी मुख्य जिल्हाशिक्षणाधिकारी हजारी लाल शिवहरे यांनी सांगितले की, या प्रकरणी कोणत्याही पालकाकडून आमच्याकडे तक्रार आलेली नाही. तक्रार मिळाल्यावर चौकशी समिती स्थापन केली जाईल आणि तिचा अहवाल सीबीएस्ई बोर्डाला पाठवण्यात येईल. (सरकारी अधिकार्यांनी मानसिकता ! तक्रार आल्याविना आम्ही स्वतःहून काहीही करणार नाहीत, असेच यातून लक्षात येते ! स्वतःहून याची चौकशी करण्याची तसदी अधिकारी घेत नाहीत, यातून त्यांची त्यांच्या कामाविषयी किती आत्मियता आहे, हे लक्षात येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
स्रोत : दैनिक सनातन प्रभात