Menu Close

चामराजनगर (कर्नाटक) येथे शिशूवर्गातील मुसलमानेतर विद्यार्थ्यांना ईदच्या दिवशी फिरण्यासाठी दर्गा आणि मशिदीत नेले

असा एकतर्फी सर्वधर्मसमभाव हिंदूंचा आत्मघात करत आहे, हे हिंदूंच्या कधी लक्षात येणार ? हिंदूंना याची जाणीव होण्यासाठी हिंदू संघटनांनी हिंदूंना धर्मशिक्षण देण्यास प्रारंभ करणे आवश्यक आहे ! -संपादक, दैनिक सनातन प्रभात

  • मशिदीत नमाजपठण करायला लावले !

  • हिंदु संघटनांकडून शिक्षण विभागाकडे तक्रार, तर शाळेच्या व्यवस्थापनाची क्षमायाचना

  • शिक्षकांनी पालकांना याविषयीची माहिती दिल्याचा शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांचा दावा

दर्ग्यामध्ये ‘उपदेश’ ऐकताना विद्यार्थी

चामराजनगर (कर्नाटक) – जिल्ह्यातील गुंडलूपेट शहरात बकरी ईदच्या दिवशी शाळेतील मुसलमानेतर विद्यार्थ्यांना दर्गा (मुसलमानाचे थडगे असलेले ठिकाण) आणि मशीद यांमध्ये फिरण्यासाठी नेण्यात आल्याची घटना समोर आली. यानंतर शाळेच्या व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. याविषयी ‘हिंदु जागरण वेदिके’ या संघटनेने शिक्षण विभागाकडे तक्रार केली आहे.

‘यंग स्कॉलर’ नावाच्या शाळेतून शिशूवर्गातील विद्यार्थ्यांना दर्गा आणि मशीद येथे नेण्यात आले होते. स्थानिक लोकांचा आरोप आहे की, एका धार्मिक नेत्याकडून या मुलांना मशिदीत नमाजपठण करण्यास आणि दर्ग्यामध्ये ‘उपदेश’ ऐकण्यास भाग पाडण्यात आले. शाळेच्या व्यवस्थापनाने याविषयी क्षमा मागत संबंधित शिक्षकांच्या विरोधात कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले आहे. शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की, शिक्षकांनी पालकांना याविषयीची माहिती दिली होती.

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *