- भूमीपूजन हे केवळ हिंदु धर्मात सांगितले आहे. अन्य धर्मात असे काही विधी नाहीत. ‘स्वतः धर्मनिरपेक्ष आहे’, हे दाखवण्यासाठी सेंथीलकुमार यांनी अशा प्रकारे उठाठेव केला, हेच यातून दिसून येते !
- हिंदुद्वेषी द्रमुक पक्षाच्या लोकप्रतिनिधीकडून याहून वेगळी अपेक्षा काय करणार ? हिंदूंच्या धार्मिक विधींमागील आध्यात्मिक दृष्टीकोन जाणून न घेता त्याला विरोध करणारे सेंथीलकुमार यांच्यासारखे लोकप्रतिनिधी हिंदूबहुल भारतात निपजणे, हे लज्जास्पद ! -संपादक
(द्रमुक म्हणजे द्रविड मुन्नेत्र कळघम् म्हणजे द्रविड प्रगती संघ)
सर्व धर्मातील धार्मिक व्यक्तींना न बोलावल्यामुळे भूमीपूजनाच्या कार्यक्रमावर आक्षेप !
चेन्नई – तमिळनाडूतील सत्ताधारी द्रमुक पक्षाचे खासदार एस्. सेंथीलकुमार यांनी एका रस्त्याचे भूमीपूजन करण्यावर आक्षेप घेतला. सेंथीलकुमार यांच्या धर्मपुरी जिल्ह्यातील मतदारसंघामध्ये एका सरकारी प्रकल्पाच्या अंतर्गत रस्त्याच्या बांधकामाला आरंभ होणार होता. त्यासाठी हिंदु पुजार्यांच्या हस्ते भूमीपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी सेंथीलकुमार यांनी भूमीपूजनाचा कार्यक्रम रहित केला.
Tamil Nadu: DMK MP S Senthilkumar objects ‘Bhoomi Pujan’ for road project, insults Hindu priesthttps://t.co/YTMmn3jnyV
— OpIndia.com (@OpIndia_com) July 17, 2022
१. या वेळी सेंथीलकुमार प्रशासकीय अधिकार्यांना उद्देशून म्हणाले, ‘‘सरकारी कार्यक्रमामध्ये केवळ एकाच धर्माच्या प्रतिनिधींकडून प्रार्थना केली जात असेल, तर अशा प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन करू नये. याविषयी तुम्हाला सूचना दिली नव्हती का ?’’ त्यांनी याविषयीचा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर खात्यावरून प्रसारित केला आहे.
२. या वेळी भगवे वस्त्र धारण केलेले एक पुजारी तेथे उपस्थित होते. सेंथीलकुमार यांनी त्यांच्याकडे बोट दाखवत सेंथीलकुमार म्हणाले, ‘‘हे काय ? इतर धर्मांचे प्रतिनिधी कुठे आहेत ? पाद्री आणि इमाम यांनाही निमंत्रित करा. जे कोणत्याच धर्माचे नाहीत; म्हणजे जे निरीश्वरवादी आहेत, त्यांनाही निमंत्रित करा.’’
३. या वेळी सेंथीलकुमार यांनी पूजेसाठी ठेवण्यात आलेले सर्व साहित्य हटवून ती जागा साफ करण्यास सांगितली.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात