- बांगलादेशमध्ये अल्पसंख्य हिंदूंवरील वाढत्या आक्रमणांविषयी जोपर्यंत भारत बांगलादेशला जाब विचारत नाही, तोपर्यंत अशा घटना थांबणे शक्य नाही ! हिंदूंनो, आता बांगलादेशातील तुमच्या बांधवांच्या रक्षणार्थ सरकारवर वैध मार्गाने दबाव आणा !
- ‘सर्जनशील स्वातंत्र्य’ (क्रिएटिव्ह फ्रीडम) या गोंडस नावाखाली हिंदूंच्या देवतांचे विडंबन करणार्यांना पाठीशी घालणारे पुरो(अधो)गामी आता गप्प का ? – संपादक
बांगलादेशमध्ये हिंदु युवकाने पैगंबर यांच्या विरोधात कथित आक्षेपार्ह पोस्ट केल्याचे प्रकरण
|
ढाका – बांगलादेशातील खुलना जिल्ह्यात असलेल्या दिघुलिया या उपजिल्ह्यातील एका हिंदु युवकाने ‘फेसबूक’वरून महंमद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह पोस्ट केल्यावरून स्थानिक धर्मांध मुसलमानांनी त्याचे घर जाळले. ही घटना १६ जुलै या दिवशीची असून त्यानंतर धर्मांधांनी हिंदूंच्या विरोधात आक्रमणाचे सत्रच आरंभले. हिंसक घटनांचे ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले आहेत. धर्मांधांनी हिंदूंची २१ घरे जाळली, ३७ दुकाने लुटली, तर ९ मंदिरांची नासधूस करून देवतांच्या मूर्तींची विटंबना केली. या घटनांमध्ये हिंदूंच्या एकूण २०० घरांवर आक्रमणे करण्यात आली. पोलिसांनी पैगंबर यांच्या विरोधात कथित आक्षेपार्ह पोस्ट करणारा आकाश साहा आणि त्याचे वडील अशोक साहा यांना अटक केली आहे. तथापि धर्मांध मुसलमानांवर कारवाई करण्यात आल्याचे वृत्त हाती आलेले नाही. (बांगलादेश पोलिसांनी साहा पिता-पुत्रांना ज्या तत्परतेने अटक केली, ती तत्परता त्यांनी धर्मांधांच्या विरोधात दाखवलेली नाही, हे लक्षात घ्या ! हिंदूंवर आक्रमण करणार्यांवर कारवाई न केल्याच्या प्रकरणी भारत सरकार बांगलादेश सरकारवर दबाव आणणार का ? – संपादक) पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हिंसक जमावाला शांत केले. (हिंसक जमावाला शांत करण्यासमवेत त्यांच्यावर कारवाई करून त्यांना शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे ! यातून भारतातील आणि बांगलादेशातील पोलीस हिंदूंवरील धर्मांधांच्या आक्रमणांच्या संदर्भात एकाच मानसिकतेनुसार वागतात, हे लक्षात येते ! – संपादक) पोलिसांनी सांगितले की, आकाशने १४ जुलै या दिवशी पैगंबर यांच्या विरोधात पोस्ट केली होती. अन्वेषण केल्यानंतर पुढील न्यायालयीन कारवाई करण्यात येईल.
“They attacked us because we are Hindus”: Anti-Hindu pogrom in Narail, B’desh https://t.co/MzqgRxbVHK
— HinduPost (@hindupost) July 17, 2022
स्रोत: दैनिक सनातन प्रभात