Menu Close

चिनी मुसलमानांनी चिनी परंपरा आणि समाज यांच्यानुसार स्वतःत पालट करावा !

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे मुसलमानांना आवाहन

भारतातील एकही शासनकर्ता भारतातील मुसलमानांना अशा प्रकारचे आवाहन करण्याचे धाडस करू शकत नाही, ही वस्तूस्थिती आहे ! -संपादक

बीजिंग (चीन) – चीनमधील मुसलमानांनी चिनी परंपरा आणि समाज यांच्या अनुसार स्वतःमध्ये पालट करावा आणि त्यांनी समाजवादी पद्धत स्वीकारावी, असे आवाहन चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी केले. ते चीनच्या शिनजियांग प्रांताच्या दौर्‍यावरील एका कार्यक्रमात केले. ‘धर्म मानणार्‍यांच्या सामान्य धार्मिक आवश्यकता निश्‍चित केल्या पाहिजेत’, असेही ते म्हणाले.

शी जिनपिंग पुढे म्हणाले की, चिनी मुसलमानांनी चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या समाजवादी व्यवस्थेप्रमाणे स्वतःला अनुकूल बनवले पाहिजे. पक्ष आणि सरकार यांच्याशी जवळीकता निर्माण केली पाहिजे. येथील उघूर मुसलमानांनी चीनशी कटीबद्ध असल्याचे दाखवले पाहिजे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *