उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना भाजपच्याच नेत्यांवर अशा प्रकारे आक्रमण करण्याचे धर्मांधांचे धाडस होतेच कसे ? -संपादक
पालिकेच्या पथकावर धर्मांधांचे प्राणघातक आक्रमण : भाजपचा नेता घायाळ
बरेली (उत्तरप्रदेश) – येथे कावड यात्रेकरूंच्या मार्गावरील बिर्याणी आणि मांस यांची विक्री करणारी दुकाने बंद करण्याचा आदेश पालिका प्रशासनाकडून देण्यात आला होता. तरीही काही ठिकाणे दुकाने चालू होती. ही दुकाने बंद करण्यासाठी पालिकेच्या पथकासमवेत गेलेले भाजपचे नेते अंकित भाटिया आणि अन्य काही लोक यांच्यावर धर्मांधांनी तलवार अन् लाठी-काठी यांद्वारे आक्रमण केले. यात अंकित भाटिया घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या आक्रमणाच्या घटनेचे सीसीटीव्ही चित्रीकरण झाले आहे. या घटनेनंतर संतप्त हिंदूंनी येथे ‘रस्ता बंद’ आंदोलन केले. सध्या येथे तणावपूर्ण शांतता आहे. येथील रामजानकी मंदिराजवळ ही घटना घडली. या प्रकरणी ४ जणांना कह्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
उत्तर प्रदेश के बरेली में मीट शॉप बंद करवाने की कार्रवाई से नाराज कुछ लोगों ने भाजपा नेता अंकित भाटिया पर हमला कर दिया। 4 आरोपितों को हिरासत में लिया गया है।https://t.co/p7NCDt69xf
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 15, 2022
स्रोत: दैनिक सनातन प्रभात