हिंदूंमध्ये आता जागृती झाली असून त्यांना धर्मांधांचे खरे स्वरूप लक्षात येऊ लागले आहे. त्याचाच परिणाम म्हणून हिंदूंनी अजमेर दर्गा आणि आता निझामुद्दीन दर्गा येथे जाणे अल्प केले आहे. पुढे ते पूर्णच बंद होईल ! -संपादक
नवी देहली – येथील प्रसिद्ध निझामुद्दीन दर्ग्यामध्ये जाणार्या हिंदूंच्या संख्येमध्ये गेल्या वर्षभरात ६० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे, अशी माहिती येथील ८४ वर्षांचे दिवाण अली मुसा निझामी यांनी दिली.
कभी दरगाह वाली गली में हिंदुओं का ताँता लगा रहता था। दीवान के अनुसार हर रोज शाम में हिंदू ही हिंदू दिखते, अनाज-पैसा बाँटते, लेकिन अब 60% तक हुए कम…
जमीनी हकीकत जानने #HazratNizamuddin की दरगाह तक हो आए @JhaAjitk https://t.co/6haw1xiQaK
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 18, 2022
१. दिवाण निझामी म्हणाले की, दोन्ही धर्मांधांतील द्वेष अजून वाढेल. या द्वेषामुळेच येथे येणार्या हिंदूंची संख्या अल्प झाली आहे. पूर्वी येथे मोठ्या संख्येने हिंदू येत होते. दुपारी २ ते रात्री ११ पर्यंत हिंदू येथे येत होते. हिंदू पूर्वी येथे भंडारा करत होते, तसेच पैसे वाटत होते. आता अशी स्थिती नाही. हिंदूंमध्ये असा प्रचार केला जात आहे, ‘येथे कबर आहे. येथे प्रार्थना केल्याने काही मिळत नाही. मंदिरामध्ये जा.’ हिंदू चांगले आहेत; मात्र जो काही प्रचार केला जात आहे, त्यामुळे द्वेष निर्माण होत आहे.
२. निझामी यांना नूपुर शर्मा प्रकरण आणि कन्हैयालाल यांचा शिरच्छेद यांविषयी विचारले असते ते म्हणाले की, अशी प्रकरणे होत असतात. काही जण नेहमीच दोन धर्मांतील लोकांना झुंजवत असतात; मात्र दर्गा शांततेचा संदेश देतो.
३. दर्ग्याच्या जवळच तबलीगी जमातचे मुख्यालय आहे. कोरोनाच्या काळात ते कुप्रसिद्ध झाले होते. याविषयी निझामी यांना विचारले असता ते म्हणाले की, या प्रकरणामुळे दर्ग्यामध्ये हिंदूंचे येणे अल्प झालेले नाही.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात