पेठवडगाव (जिल्हा कोल्हापूर) : राजस्थानमधील उदयपूर येथील ‘कन्हैयालाल’, तसेच महाराष्ट्रातील अमरावती येथील ‘उमेश कोल्हे’ या हिंदूंच्या हत्या करणार्यांना फाशी, तसेच त्यांना साहाय्य करणार्या सर्वांवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पेठवडगाव येथे नगर परिषद प्रशासक विद्या कदम यांना १८ जुलै या दिवशी देण्यात आले.
या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. धनंजय गोंदकर, श्री. जगदीश महालदार, भाजप युवा मोर्चाचे विकास कांबळे, सरसेनापती श्री धनाजीराव जाधवराव प्रतिष्ठानचे श्री. धनाजी सलगर, भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस राजेंद्र बुरुड, बजरंग दलाचे श्री. किरण पुरोहित, बजरंग दल, वडगावचे अध्यक्ष श्री. विशाल सपाटे, सर्वश्री मंदार जोशी, सागर लोळगे, प्रमोद जगताप, सुहास झगडे, संदीप सालकर, किरण कोळी, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात