Menu Close

हरियाणामध्ये खाण माफियाकडून पोलीस उपअधीक्षकांची हत्या

खाण माफियाने पोलीस उपअधीक्षकांच्या अंगावर डंपर घालून त्यांना चिरडले

यावरून ‘खाण माफियांना कायद्याचे भय राहिले नाही’, हेच दिसून येते. सरकारने अशांच्या विरोधात जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना भर चौकात फासावर लटकवले पाहिजे ! -संपादक

मेवातचे पोलीस उपअधीक्षक सुरेंदरसिंह बिश्‍नोई

चंडीगड – मेवातचे पोलीस उपअधीक्षक सुरेंदरसिंह बिश्‍नोई यांची खाण माफियांनी हत्या केली. पोलीस पचगाव येथील डोंगराळ भागात अवैध खनन करणार्‍यांना अटक करण्यासाठी गेले असता खाण माफिया असलेल्या डंपरचालकाने बिश्‍नोई यांना डंपरखाली चिरडले. या वेळी बिश्‍नोई जागीच ठार झाले. ते यावर्षी निवृत्त होणार होते. याविषयी नूंह येथील पोलिसांनी, ‘फरार झालेल्या खाण माफियाला शोधण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे’, असे म्हटले आहे.

सौजन्य : India TV

१. बिश्‍नोई यांना सकाळी ११ वाजता, ‘संबंधित ठिकाणी अवैध खनन होत आहे’, अशी माहिती मिळाली. संबंधितांवर कारवाई करण्यासाठी ते पोलिसांसह घटनास्थळी पोचले.

२. त्या वेळी घटनास्थळी अवैध खनन करणार्‍यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी डंपरमधून जाणार्‍या एका खाण माफियाने बिश्‍नोई याांन धडक मारली आणि त्यांच्या अंगावर डंपर घातला.

३. हरियाणामध्ये याआधीही खाण माफियांनी पोलिसांवर आक्रमण केल्याच्या घटना घडल्या आहेत. सोनीपत येथे अवैध खनन करणार्‍यांना पकडण्यासासाठी गेलेल्या पोलिसांवर खाण माफियांनी आक्रमण केले होते. त्या वेळी खाण माफियांनी एका पोलीस उपनिरीक्षकाची वर्दी फाडली, तसेच एका पोलिसाला मारहाण केली होती.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *