Menu Close

सीतामढी (बिहार) येथे नूपुर शर्मा यांचा व्हिडिओ पहाणार्‍या हिंदु तरुणावर धर्मांधांकडून प्राणघातक आक्रमण

  • भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्हणणारे भारतातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी, तसेच जगातील इस्लामी देश आता का बोलत नाहीत ?
  • हिंदूंनी स्वतःचे रक्षण करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे किती आवश्यक झाले आहे, हे या घटनेतून अधिक स्पष्ट होते !
  • बिहारमध्ये संयुक्त जनता दल समवेत भाजप सत्तेत असतांना हिंदूंच्या संदर्भात असा भेदभाव होणे हिंदूंना अपेक्षित नाही ! -संपादक
प्रतीकात्मक छायाचित्र

सीतामढी (बिहार) – येथील बाजारामध्ये नूपुर शर्मा यांचा व्हिडिओ पहाणार्‍या अंकित झा या तरुणावर धर्मांधांनी चाकूद्वारे प्राणघातक आक्रमण केले. अंकितची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर दरभंगा येथील रुग्णालयातील अतीदक्षता विभागात उपचार चालू आहेत.

अंकितने सांगितले की, तो त्याच्या मित्रासमवेत दुकानात बसून व्हॉट्सअ‍ॅप पहात होता. त्यात नूपुर शर्मा यांचा एक व्हिडिओ होता. मागून काही जण आले आणि त्यांनी मला विचारले ‘नूपुर शर्माचा समर्थक आहेस का ?’ त्यावर मी ‘हो’ म्हणताच ते संतापले. त्या तिघांनी प्रथम सिगारेटचा धूर माझ्या चेहर्‍यावर उडवला. त्यानंतर शिवीगाळ चालू केली. मी विरोध केल्याने तिघांनी माझ्या उजव्या बाजूला कंबरेजवळ चाकूने वार केले.

पोलिसांवर प्रकरण दडपल्याचा आरोप

हे प्रकरण १६ जुलैचे आहे. तक्रारीतून नूपुर शर्मा यांचा उल्लेख काढून टाकल्यानंतर पोलिसांनी अंकितच्या कुटुंबियांची तक्रार नोंदवून घेतली. या प्रकरणी पोलिसांनी नानपूर गावातील गौरा उपाख्या महंमद निहाल, महंमद बिलाल यांच्यासह ५ जणांना आरोपी केले असून त्यांपैकी दोघांना अटक केली आहे. अंकितच्या कुटुंबाला सातत्याने धमक्या मिळत आहेत.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *