Menu Close

ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून चालवण्यात येणार्‍या ‘विद्यामाता हायस्कूल’ची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश !

हायस्कूलमध्ये चढ्या दराने शालेय साहित्याची विक्री होत असल्याचे प्रकरण

  • हिंदूंनो, ख्रिस्ती शाळांचा विद्यार्थ्यांकडून पैसे उकळण्याचा डाव जाणा !
  • विद्यार्थ्यांना लुबाडणार्‍या ख्रिस्ती शाळांमध्ये मुलांना प्रवेश घ्यायचा का, ते ठरवा ! -संपादक
विद्यामाता हायस्कूल धाराशिव

धाराशिव, १९ जुलै (वार्ता.) – शहरातील ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून चालवण्यात येणार्‍या ‘विद्यामाता हायस्कूल’ची चौकशी करण्यासाठी ७ जणांची समिती स्थापन करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. ‘बालकांचा विनामूल्य आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९’ आणि ‘माध्यमिक शाळा संहिता नियम १९८६’ नुसार पडताळणी करून अहवाल कार्यालयास सादर करण्याचे आदेश या समितीला देण्यात आले आहेत.

‘विद्यामाता हायस्कूल’ प्रतिवर्षी शाळेत चढ्या दराने पुस्तके, वह्या, गणवेश, बूट आदी शालेय साहित्याची विक्री करत असल्याची तक्रार पालकांनी मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्याकडे केली होती. त्यानुसार दादा कांबळे यांनी घटनेची खात्री करून गटशिक्षणाधिकारी संजीव बागल यांच्याकडे पुराव्यांसह तक्रार दिली होती, तसेच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांकडे ‘शाळेची मान्यता काढण्यात यावी’ या संदर्भात निवेदनही दिले होते.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *