Menu Close

मी गर्वाने सांगू शकतो की, मी हिंदु आहे आणि हिंदु असणे, हीच माझी ओळख आहे !

ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचे दावेदार असणारे भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचे २ वर्षांपूर्वीचे विधान होत आहे प्रसारित !

भारतातील किती राजकारणी असे म्हणण्याचे धाडस करतात ? -संपादक

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमधील सरकार कोसळल्यानंतर तेथे नवीन सरकार स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषी सुनक आघाडीवर आहेत. त्यांना ब्रिटीश नागरिकांकडून समर्थन मिळत आहे. २ वर्षांपूर्वी त्यांनी मागील सरकारमध्ये अर्थमंत्रीपद स्वीकारल्यानंतर श्रीमद्भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली होती. याविषयी सामाजिक माध्यमांतून आठवण काढली जात असून त्याविषयीची माहिती प्रसारित केली जात आहे. एका दैनिकाने सुनक यांची या शपथेनंतर मुलाखत घेतली होती. तेव्हा सुनक यांनी म्हटले होते, ‘मी आता ब्रिटनचा नागरिक आहे; मात्र माझा धर्म हिंदु आहे. भारत माझा धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. मी गर्वाने सांगू शकतो की, मी एक हिंदु आहे आणि हिंदु असणे, हीच माझी ओळख आहे.’

१. सुनक त्यांच्या पटलावर नेहमीच श्री गणेशाची मूर्ती ठेवतात. त्यांनी यापूर्वी गोमांसाचा त्याग करण्याचे आवाहन केले आहे. ते स्वतःही कधी गोमांसाचे सेवन करत नाहीत.

२. ऋषी सुनक हे पंजाबमधील खत्री कुटुंबातील आहेत. त्यांचे आजोबा रामदास सुनक हे गुंजरावाला येथे रहात होते. वर्ष १९३५ मध्ये ते केनिया येथे नोकरीच्या निमित्ताने गेले. तेथून ते ब्रिटनला गेले.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *