Menu Close

दर्शन तिरुनल महामहम् उत्सवाद्वारे हिंदूंना फसवण्याचा ख्रिस्ती मिशनर्‍यांचा डाव !

ख्रिस्त्यांचे खरे स्वरूप ! हिंदूंनो, ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या या भूलथापांना बळी पडू नका !

कोची (केरळ) – राज्यात सध्या ठिकठिकाणी दर्शन तिरुनल महामहम् हा उत्सव साजरा करण्याची भित्तीपत्रके लागली आहेत. ती वाचून कोणत्याही हिंदूची हा हिंदु उत्सव असेल, अशी समजूत होते; मात्र तसे काही नसून भोळ्या हिंदूंना फसवून त्यांचे धर्मांतर करण्याचे आणखी एक जाळे ख्रिस्ती मिशनर्‍यांनी विणले आहे.

ख्रिस्ती मिशनर्‍यांनी भोळ्या भाबड्या हिंदूंना फसवण्यासाठी हिंदु धर्मातील प्रथा, परंपरा यांची भ्रष्ट नक्कल केली आहे. त्यात मंदिरातील पूजा, भजने, धर्मग्रंथ इत्यादींचा समावेश आहे. त्यातलाच दर्शन तिरुनल महामहम् हा एक प्रकार आहे. या उत्सवाच्या तिन्ही शब्दांचा ख्रिती धर्माशी काही एक संबंध नाही. दर्शन हा शब्द हिंदु धर्मात देवतेच्या दर्शनासाठी वापरला जातो. त्याचे विदेशातील धर्माशी काही घेणेदेणे नाही. तिरुनल म्हणजे त्या तिथीचा मुख्य ग्रह अथवा तारा. ख्रिस्ती धर्म ज्योतिषशास्त्रावर विश्‍वास ठेवत नाही. त्यामुळे तिरुनल या शब्दाशी त्यांचा काही संपर्क येत नाही. महामहम् म्हणजे प्रत्येक १२ वर्षांनी जेव्हा गुरु ग्रह सिंहस्थात प्रवेश करतो, म्हणजेच हिंदु धर्मातील कुंभमेळ्यासारखा मुहूर्त. याचा विदेशी ख्रिस्ती धर्मात कुठलाही उल्लेेख नाही. त्यामुळे ही सर्व फसवेगिरी हिंदूंना फसवून त्यांचे धर्मांतर करण्यासाठी आहे.

हैदंव केरलम् या केरळमधील हिंदुत्ववादी संघटनेने सर्व हिंदूंना ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या या फसवेगिरीविषयी सतर्क केले आहे. हिंदूंच्या प्रथा परंपरांची भ्रष्ट नक्कल करायची अनुमती ख्रिस्ती धर्मात आहे काय ?, असा प्रश्‍न या संघटनेने विचारला आहे. यावरूनच हिंदु धर्माचे महात्म्य लक्षात येते. केवळ हिंदूंनीच नव्हे, तर धर्मांतर झालेल्या हिंदूंनी याची दखल घेऊन महान हिंदु धर्मात परत यावे, असे आवाहन हैदंव केरलम् या संघटनेने केले आहे.

(संदर्भ : हैदंव केरळम् संकेतस्थळ)

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *