- बांगलादेशात हिंदूंवर सातत्याने आक्रमणे होत असतांना भारत सरकारने मौन बाळणे हिंदूंना अपेक्षित नाही !
- भारतात मुसलमानांवर आक्रमणे झाली, तर इस्लामी देश आणि त्यांच्या संघटना तात्काळ भारताला जाब विचारतात, हे भारत सरकारने लक्षात घ्यावे ! -संपादक
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील माणीकगंज जिल्ह्यातील शिवलोय उपजिल्हातील एका हिंदु कुटुंबावर अवलाद हुसेन याने त्याच्या टोळीसह आक्रमण केले, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या ट्विटर खात्यावरून ट्वीट करून देण्यात आली. ‘काही दिवसांपूर्वी देशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेश ‘मदिना चार्टर’चे (‘सौदी अरेबियातील मदिना येथे ६ व्या शतकात मुसलमानांनी लिहिलेल्या राज्यघटने’चे) पालन करणार असल्याची घोषणा केली होती’, असेही म्हटले आहे. (यातून ‘बांगलादेशात हिंदूंना कोणतेही स्थान नसणार’, हे स्पष्ट होते. भारतातील शेजारी इस्लामी देशांत हिंदूंचे जीवन नरकासमान झाले असतांना भारत त्याकडे निष्क्रीय राहून पहात असेल, तर हिंदूंसाठी ते लज्जास्पदच होय ! -संपादक)
#ShameOnHasina#StopKillingBangladeshiHindus pic.twitter.com/PRZBirfM7S
— Voice Of Bangladeshi Hindus ?? (@VoiceOfHindu71) July 19, 2022
स्रोत: दैनिक सनातन प्रभात