Menu Close

देहलीतील मुसलमानबहुल सीलमपूर येथे अज्ञातांनी कावड यात्रेवर टाकले मांस !

‘हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका आणि धार्मिक यात्रा यांवर मुसलमानबहुल भागांतून आक्रमणे का होतात ?’, हे एकही निधर्मीवादी किंवा पुरो(अधो)गामी कधीही सांगत नाही. उलट ‘देशात मुसलमान असुरक्षित आहेत’, अशी बांग मात्र नेहमीच दिली जाते ! -संपादक

नवी देहली – येथील मुसलमानबहुल सीलमपूर भागात पुलाच्या खालून जाणार्‍या कावड यात्रेवर अज्ञातांनी मांसाचा तुकडा टाकल्याने येथे तणाव निर्माण झाला. येथे जवळपास एक घंटा रस्ता बंद आंदोलन करण्यात आले. याविषयी एका कावड यात्रेकरूने, ‘आम्ही या भागात येईपर्यंत स्थिती चांगली होती. सर्वत्र आमचे स्वागत करण्यात येत होते; मात्र सीलमपूरमध्ये आल्यावर आमच्यावर मांस फेकण्यात आले. ‘ते कधी आणि कुणी टाकले ?’, हे लक्षात आले नाही’, असे सांगितले.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *