Menu Close

हरिद्वार येथे कावड यात्रेच्या मार्गात नमाजपठण करणार्‍या ८ जणांना अटक !

एरव्ही काहीतरी कारण काढून हिंदूंवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांचा कावड यात्रेच्या कालावधीत आणि तेही हरिद्वारसारख्या तीर्थक्षेत्री दंगल घडवण्याचा हा प्रयत्न नसेल कशावरून ? -संपादक

प्रतीकात्मक छायाचित्र

हरिद्वार (उत्तराखंड) – सध्या हरिद्वार तीर्थक्षेत्री कावड यात्रा चालू असून त्यावर आतंकवादी आक्रमण होण्याची शक्यता असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. अशातच येथे राणीपूर क्षेत्रात असलेल्या शिवालिक नगरमध्ये २१ जुलैच्या सायंकाळी साप्ताहिक बाजार भरल्याच्या मध्यवर्ती ठिकाणी ८ मुसलमानांनी रस्त्यावर सामूहिक नमाजपठण केले. या मार्गावरून कावड यात्रा जाणार होती. नमाजपठण चालू असल्याचे समजताच पोलिसांनी आठही जणांना अटक केली. अटक केलेल्यांमध्ये महंमद निजाम, नसीम, मुरसलीन, अशरफ, अशरफ असगर, मुस्तफा, सज्जाद अहमद आणि इकराम यांचा समावेश आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *